कुमारनगरात तरुणावर वस्तार्‍याने हल्ला

0
धुळे । दि.26 । प्रतिनिधी-मागील भांडणाच्या वादातून तरुणावर वस्तार्‍याने हल्ला करुन जखमी केल्याप्रकरणी सात जणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील कुमारनगर येथे राहणारा योगेश चंदलाल बजाज याचा मागील भांडणावरुन रमेश जैसाराम कुकरेजा याच्याशी वाद झालेला होता.
या वादातून पुन्हा दि. 24 ऑगस्ट रोजी दोघात वाद झाला. या वादात रमेशसह सात जणांनी योगेशवर हल्ला केला. त्याला वस्तार्‍याने भोसकून जखमी केले.

याबाबत योगेश बजाज यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 324, 143, 147, 148, 149, 323, 504 प्रमाणे रमेश जैसाराम कुकरेजा, शाम जैसाराम कुकरेजा, दिलीप जैसाराम कुकरेजा, दीपेश शाम कुकरेजा, अनिल रमेश कुकरेजा, कुमार नरोत्तम डियालानी, मनीकुमार डियालानी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरपूर येथे चोरी- शिरपूर येथील काझीनगर प्लॉट नं. 29 मधून अज्ञात चोरट्याने आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला. याबाबत शादाब काझी यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेवर हल्ला- नागपूर, ता. साक्री येथे राहणारी आपूबाई नारायण चव्हाण यांच्या वडिलोपार्जित शेतजमिन सैयदनगर येथे आहे. सदर शेतजमीनही अक्कलपाडा धरणात बुडीत क्षेत्रात सरकार जमा झालेली आहे. सदर शेतजमीनीचा मोबदल्याचा पैसा त्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. सदर पैशातून 60 हजार रुपये मिळावेत म्हणून जगनसह चार जणांनी आपूबाईला मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत आपूबाई चव्हाण यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे जगन मुन्ना चव्हाण, योगेश जगन चव्हाण, डिगंबर जगन चव्हाण, लालचंद जगन चव्हाण यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना रायते हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*