सेनेने दानवेंच्या पुतळ्याला फासले काळे

0
धुळे / भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेना व युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेने दानवेंंच्या पुतळ्याला काळे फासले तर युवक काँग्रेसतर्फे दानवेंच्या प्रतिमेला शेण खाऊ घातले.

शिवसेनेतर्फे आंदोलन- खा. दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध शिवसेनेतर्फे करण्यात आला.

दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शहरातील स्वस्तिक चौकात काळे फासले यावेळी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतिष महाले, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, संजय गुजराथी, कैलास पाटील, नितीन पाटील, मनिष जोशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

युवक काँग्रेसतर्फे आंदोलन- खा. दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध युवक काँग्रेसतर्फे करण्यात आला. महापालिकेसमोर दानवेंच्या फोटोला शेण खाऊ घालीत प्रतिकात्मक आंदोलन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश काटे, प्रभा परदेशी, जावेद शहा, डॉ. कैलास सोनवणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*