माजी खासदार पुत्राची आत्महत्त्या

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-धुळ्याचे माजी खा.कै.मोतिराम भोये यांचा ज्येष्ठ सुपुत्र माजी आ.योगेश भोये व माजी कृषी सभापती शिवाजी भोये यांचे वडिल बंधू गुलाबराव रेश्मा भोये (से.नि. बसचालक नवापूर आगार) यांनी आज सकाळी 9.30 वाजता महुबन शिवारातील स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला नॉयलॉनच्या दोराने गळफास घेवून आत्महत्या केली.
घटनेची खबर त्यांचे बंधू अनिल रेश्मा भोये यांनी पिंपळनेर पोलिसात दिली.

घटनास्थळी पिंपळनेर पोलीसांनी जावून मृतदेह ताब्यात घेतला. पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात पी.एम. करून त्यांचेवर पिंपळनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*