राष्ट्रध्वजाचा मान राखा !

0

धुळे । दि.12 । प्रतिनिधी-राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा मान राखावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांनी केले आहे.

15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वतंत्र दिन साजरा केला जातो. समारंभाचे विविध शासकीय, निमशासकीय तसेच खासगी संस्थांमार्फत ध्वजारोहण करण्यात येते.

स्थानिक पातळीवर जनतेमार्फत राष्ट्रीय ध्वजाविषयी असलेले प्रेम, निष्ठा, अभिमान दर्शविण्यासाठी वैयक्तिकरीत्या छोट्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो.

राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. याबाबत शासनामार्फत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. तसेच जाणीवपूर्वक जर राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा- 1971 चे कलम 2 अनुसार कारवाई करण्यात येते.

काही वेळेस राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच कला, क्रीडाप्रसंगी वैयक्तिकरीत्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज रस्त्याचे कडेला किंवा इतर ठिकाणी पडलेले, विखुरलेले आढळतात.

हे दृश्य राष्ट्रीय प्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने राष्ट्रध्वजाच्या वापरानंतर एकतर त्याचा योग्य तो मान राहील याप्रमाणे ते ठेवण्यात यावेत.

अन्यथा जर राष्ट्रध्वज खराब झालेले असतील, तर त्यांचा योग्य तो मान राखून ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करणे आवश्यक असते.

रस्त्यात पडलेले, इतस्त: विखुरलेले राष्ट्रध्वज जर प्लास्टिकचे असतील, तर प्लास्टिक बरेच दिवस नष्ट होत नसल्याने असे ध्वज बरेच दिवस त्या ठिकाणी दिसतात. राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे.

 

LEAVE A REPLY

*