शेतकर्‍यांच्या आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल

0
धुळे / शेतकर्‍यांना वाढीव मोबदला मिळणार राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 चे चौपदरीकरण रस्त्याचे काम शेतकरी संघर्ष समितीने दीड महिन्यापासून धुळे जिल्ह्यातील मुकटी ते नवापूरपर्यंत कामबंद पाडण्यात आले होते.
यासंबंधी दि. 11 मे 2017 रोजी जिल्हाधिकारी धुळे यांच्या दालनात शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकार्‍यांशी सुमारे 2 तास चर्चा झाली.

ह्या चर्चेमध्ये भारत सरकार व जिल्हा प्रशासन यांच्यावतीने कायद्याच्या चौकटीत राहून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त वाढीव मोबदला दिला जाईल असे ठोस आश्वासन देवून शेतकर्‍यांमध्ये एक विश्वासाचे वातावरण आहे.

ह्यामध्ये धुळे, साक्री, नवापूर या तालुक्यातील प्रत्येक एका गावाची निवड करुन त्या गावांचा निवाडा 31 मे 2017 पर्यंत देण्याचे ठरलेले आहे.

या नुसार शेतकर्‍यांचा निवाडा देतांना शेतकर्‍यांमध्ये समाधानकारक वातावरण असल्यास पुढील गावाचे सर्व निवाडे दोन महिन्याच्या आत देण्यात येतील.

मात्र शेतकर्‍यांमध्ये निवाडा संबंधी असमाधानकारक वातावरण असल्यास शेतकरी संघर्ष समिती सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेवून 1 जून 2017 पासून पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

असे जिल्हा प्रशासनास सांगण्यात आलेले आहे. मा. जिल्हाधिकारी धुळे यांचेशी शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकार्‍यांनी वरील सर्व चर्चा केलेली आहे.

 

LEAVE A REPLY

*