फागणे पाणी योजनेच्या प्रक्रियेला गती

0
धुळे । दि.11 । प्रतिनिधी-तालुक्यातील फागणे पाणी पुरवठा योजनेच्या प्रक्रीयेला गती मिळाली असून सदर योजना मंजुर व्हावी म्हणून आ.कुणाल पाटील यांनी प्रयत्न केले.
या योजनेचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्यात आला आहे, त्याबद्दल फागणे ग्रामस्थांच्यावतीने आ.पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
गेल्या दोन ते तीन वर्षापासून फागणे गावात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळा असो कि पावसाळा पाण्याच्या संकटाला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे.

गावांतर्गत पाईपलाईन 40 वर्ष जूनी असल्याने जागोजागी गळती लागलेली असते. पाणी पुरवठा करणारी टाकीही कालबाह्य झाली आहे.फागणे आणि परीसरातील गावांसाठी 21 गाव पाणी पुरवठा योजना उभारण्यात आली होती.

ही योजना सन 2013 पासून बंद आहे. म्हणून या गावासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजुर करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी आ.कुणाल पाटील यांच्याकडे केली होती.

आ.कुणाल पाटील यांनी फागणे पाणी पुरवठा योजनेचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करून घेतला.त्यासाठी एकूण 90 लक्ष रूपयाचा निधीचीही तरतूद केली.सदर योजना मंजुर केल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आ.कुणाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच कल्पनाताई पाटील, उपसरपंच मालूबाई पाटील, पं.स.सदस्य जे.डी.पाटील, माजी सरपंच भाईदास पाटील, शिवाजी अहिरे, हंसराज पाटील, खेमराज पाटील,गोपीचंद सुर्यवंशी, रोहिदास सुर्यवंशी, सुरेश बडगुजर,भिकन जाधव,जाविद पिंजारी, रविंद्र अहिरे,आरिफ पिंजारी, प्रभाकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान या योजनेच्या प्रशासकिय प्रक्रीयेला गती देण्याच्या सूचना आ. पाटील यांनी संबधित विभागाला दिल्या असून याबाबतचा सर्व्हे करण्यात आला आहे.

सदर योजना फागणे धरणापासून करण्यात येणार असून गावांतर्गत पाईपलाईन नव्याने केली जाणार आहे. गावाला कायमस्वरूपी शुध्द पाण्याचा पुरवठा करता यावा म्हणून जलशुध्दीकरण केंद्राचीही उभारणी केली जाईल.

त्याकरीता लागणारा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी लागणार्‍या वाढीव निधीसाठीही शासनाकडे प्रयत्न केले जातील असे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*