राज्य राखीव पोलीस दलातर्फे मैत्री अभियान

0
धुळे । दि.11 । प्रतिनिधी-राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6 तर्फे शालेय विद्यार्थ्यांना भारताचे आंतरिक सामर्थ्य, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची ओळख व माहिती होण्यासाठी समादेशक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मैत्री अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
मैत्री अभियानात विद्यार्थ्यांना राज्य राखीव पोलीस बलाच्या कार्याची माहिती, गटमुख्यालय परिसर, ऑबस्टॅकल, पोलीस परेड, गटातील विविध खडतर प्रशिक्षणे, दारुगोळा व शस्त्र प्रदर्शन व हाताळणी यासारख्या विषयांची माहिती देण्याबरोबरच पोलीस बॅण्ड पथकाचे सादरीकरणही दाखविण्यात येणार आहे.

यावेळी विद्यार्थ्यानी गटातील पोलीस अधिकारी, कर्मचाज्यांच्या खेळ सराव सामन्यांचाही आयोजन करण्यात आले आहे.अभियानाचे उदघाटन कार्यक्रमात आज न्यु सिटी हायस्कुल, धुळे येथील 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

यांनी विद्यार्थ्यांना राज्य राखीव पोलीस बलाबददल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी भविष्यात सैन्यात अधिकारी होवून देशसेवा करावी.

असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधून व शंकांचे समाधान केले. प्रास्ताविक व आभार अनिल कदम समादेशक सहाय्यक यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*