धुळ्याचा पाणीप्रश्न पेटला !

0
धुळे / शहरातील प्रभाग क्र.30 मध्ये सप्तश्रृंगी नगरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरीकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत.
म्हणून या प्रभागातील विहिरीतील गाळ काढण्यात यावा अशी मागणी नगरसेवक संदीप पाटोळे यांनी केली आहे.
याबाबत आयुक्त संगिता धायगुडे यांना निवेदन देण्यात आले आहे.

प्रभाग क्र.30 मधील सप्तश्रृंगी नगरमध्ये गेल्या 6 महिन्यापासून नऊ दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे.

पण तोही कमी दाबाने होत असल्यामुळे या कॉलनीतील नागरिकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहे. या कॉलनीत श्रमजीवी नागरीक राहतात.

त्यांना काम बुडवून पाण्याचा शोध घ्यावा लागतो. या कॉलनीतील सप्तश्रृंगी मंदिराच्या पाठीमागे विहीर आहे. परंतु या विहिरीत गाळ असल्याने पाणी भरणे अशक्य होते.

त्यामुळे या विहिरीतील 15 ते 20 फुटावरील गाळ काढण्यात यावा त्यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात यावी. तसेच नळांना जास्त दाबाने पाणीपुरवठा करावा अशी मागणीही पाटोळे यांनी केली आहे.

समाजवादी पार्टीतर्फे मनपात धरणे आंदोलन

शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्वरित यावर उपाययोजना करण्यात यावी व नगररचना विभाग,वसूली विभागातर्फे नियमबाह्य वसूलीवर बंदी आणावी म्हणून समाजवादी पार्टीतर्फे मनपात धरणे आंदोलन करण्यात आली.

शहराच्या मुलभूत गरजांपैकी अंत्यत महत्वाची पाणीची गरज आहे. परंतु सध्या शहरात मुबलक पाणीसाठा असतांनाही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

पाण्याच्या नियोजनाअभावी ही टंचाई निर्माण झाली आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणीपुरठ्याच्या नियोजनात तांत्रिक बिघाड होतो.

जलवाहिनींना ठिकठिकाणी गळती लागली आहे. तापी योजनेची गळती दुरुस्त होती व लगेच नादुरुस्तही होते. शहराला एक किंवा दोन दिवसाआड पाणी देणे शक्यत आहे.

परंतु इच्छा शक्ती अभावी पाणी पुरवठा केला जात नाही.

LEAVE A REPLY

*