पटेल आश्रमशाळांचे चार विद्यार्थी राज्यात अव्वल

0
शिरपूर । दि.10 । प्रतिनिधी-शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित तिन माध्यमिक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करुन त्यांनी महाराष्ट्र राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
याबद्दल शासनातर्फे आदिवासी विकास मंत्री ना.विष्णू सावरा यांच्या हस्ते आदिवासी गौरव दिनी पुणे येथे बालगंधर्व नाट्यमंदिरात आयोजित सोहळयात चारही विद्यार्थ्यांना भरघोस रकमेसह पारितोषिक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. याबद्दल संस्थेच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला.

बाल गंधर्व नाट्यमंदिर पुणे येथे आदिवासी गौरव दिनी या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री ना. विष्णू सावरा यांच्या हस्ते तसेच राज्यमंत्री अंबरीश राजे आत्राम, आदिवासी विभागाच्या सचिवश्रीमती मनिषा वर्मा, आदिवासी नासिक विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णीया मान्यवरांच्या पमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

तसेच पुणे येथून आल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांचा व पालकांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, गोपाल भंडारी, सीईओ डॉ.उमेश शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दहावीच्या मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत वाघाडी येथील आश्रमशाळेतील पूनम सुनिल पावराया विद्यार्थिनीने 90.40 टक्केगुण प्राप्त करुन आदिवासी विकास विभागातून मुलींमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिला मान्यवरांच्या हस्ते 80,000 रुपयांचे (80 हजार) बक्षिस, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

शिरपूर येथील आश्रमशाळेतीलआकाश आंग्रेज्या पावरा याने 91.80 टक्के गुण व निमझरी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थी निलेश मोहन पावरा याने 91.80 टक्के गुण मिळवून आदिवासी विकास विभागातून राज्यात मुलांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना उपस्थित मंत्री महोदयांच्या हस्ते प्रत्येकी 60,000 रु. (60 हजार)रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

वाघाडी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थी मुकेश मोहन पावरा याने 91.40 टक्के गुण मिळवून राज्यात तृतिय क्रमांक प्राप्त केला. त्याला मान्यवरांच्या हस्ते 45,000 रु. (45 हजार) रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल, आ.काशिराम पावरा, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, धुळे प्रकल्प अधिकारी राजाराम हळपे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डी.सी.येशी, गोपालभाऊ भंडारी, शैलेंद्र अग्रवाल, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, अशोक कलाल, मुख्याध्यापक एच.के.कोळी, मुख्याध्यापक पी.डी.पावरा, मुख्याध्यापक ए.पी.ठाकरे, मुख्याध्यापक बी.एम.माळी, बी.डी.शिरसाठ, इंजिनिअर शिरसाठ, राजेंद्र सोनार, सुनिल जैन, नवल वंजारी त्यांचे पालक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

 

LEAVE A REPLY

*