दोंडाईचात घरफोडी: 66 हजारांचा मुद्देमाल लंपास

0
धुळे / दोंडाईचा शहरातील जनता कॉलनीत घरफोडून अज्ञात चोरट्याने 66 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 दोंडाईचा शहरातील जनता कॉलनीत सुरेश पोपटराव चौधरी हे राहतात. त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने दि.7 मे च्या सायंकाळी 7.30 ते 10 मे च्या पहाटे चार वाजेपर्यंत गोदरेज कपाटातून 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.

त्यात 10 ग्रॅम सोन्याची चैन, 5 ग्रॅम वजनाच्या दोन अंगट्या, कानातील टोंगल, सोन्याचे अर्धा तोळ्याचा तुकडा यांचा समावेश आहे. याबाबत सुरेश पोपटराव चौधरी यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

तरुणावर प्राणघातक हल्ला- साक्री तालुक्यातील सामोडे येथील जुने गाव येथे राहणारे निलेश शशिकांत घरटे, यांच्यावर संशय घेवून मधुकर सुकदेव घरटे हा शिविगाळ करतो, याबाबत मधुकरला विचारल्याचा राग येवून दि.10 मे रोजी दु.12 वाजता मधुकरसह 11 जणांनी निलेश यांना शिवीगाळ करुन लाकडी शिंगाड्याने मारहाण केली.

तसेच शशिकांत घरटे यांच्या डोक्यावर मारुन गंभीर जखम केली. याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात निलेश शशिकांत घरटे यांनी फिर्याद दिली.

अपघातात ठार- मुंबई-आग्रा महामार्गावर आयशर गाडी (क्र. एम.पी.09 जीजी 599)चे मागील दोन्ही टायर फुटल्यामुळे ती पार्कींग लाईट लावून उभी करण्यात आली होती.

त्यावेळी धुळ्याकडून शिरपूरकडे जाणारी एम.पी.14 ईटी 5050 क्रमांकाच्या आयशर गाडीने उभ्या असलेल्या गाडीला धडक दिली.

या अपघातात मो.अकरम मो.मंगळु आणि नुंद छगनलाल चव्हाण हे जखमी झाले. या अपघातास मो.अकरम मो.मंगळु हा कारणीभूत आहे.

अशी फिर्याद जितेंद्र मन्साराम वासकले यांनी दिली.

तरुणाला मारहाण- शहरातील स्वामीनारायण सोसायटीतील प्लॉट नं. 35 मध्ये राहणारे महेश भोजराज करनकाळ (वय 28) यांची वहिनी सुनिताबाई या पाणी व्यवस्थीत मारा, पाय घसरुन पडून जाईल असे सांगितल्याचा राग पप्पू उर्फ दुर्गेश बन्सीलाल शिरसाठ यांना सांगितले.

त्याचा राग येवून पप्पूने महेश करनकाळ यांच्या डोक्यावर सळई मारुन जखमी केले. तर हा वाद कमलेश सोडविण्यासाठी गेले असता भैया याने सळईने मारहाण करून जखमी केले.

अशी फिर्याद महेश भोजराज करनकाळ यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात दिली.

शेतकर्‍याला मारहाण- अर्थे बुद्रुक ता.शिरपूर येथे राहणारे लोटन दयाराम पाटील या शेतकर्‍याशी शेतात जाण्या-येण्याच्या रस्त्यावरुन ब्रिजलाल पुंडलीक पाटील यांनी वाद घातला.

या वादातून लोटन यांना कुर्‍हाडीने मारहाण करुन जखमी केले. तसेच लोटनची पत्नी मिराबाई यांनाही मारहाण केली व शांताबाई दयाराम पाटील यांना ढकलून शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत लोटन दयाराम पाटील यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

एकाला मारहाण- सामाडे ता.साक्री येथे राहणारे विजय सुकदेव घरटे हे शशिकांत जयराम घरटे यांच्याकडे रेशन घेण्यासाठी गेले असतांना विजय घरटे यांना जुन्या पावत्या दिल्या नाही याचा राग येवून शशिकांतसह सात जणांवर शिविगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत विजय सुकदेव घरटे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मोटारसायकल चोरी- शहरातील देवपूर परिसरात असलेल्या सुयोग नगरात राहणारे कपिल दिपक मराठे यांनी त्यांच्या मालकीची 40 हजार रुपये किमतीची एम.एच.10 ए.टी.8008 ही घरासमोर लावलेली होती.

अज्ञात चोरट्याने सदर मोटर सायकल चोरुन नेली. याबाबत कपील मराठे यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

LEAVE A REPLY

*