शिरपूरात जलयुक्त शिवार प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

0
शिरपूर । प्रतिनिधी-जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समिती व जिल्हा संसाधान संस्था श्री चिराईदेवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अर्थे ता.शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचा शिरपूर येथे शुभारंभ झाला.
क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते विठ्ठल लॉन्स येथे करण्यात आले.

याप्रसंगी जि.प.उपाध्याक्ष देवेंद्र पाटील, महिला बालकल्याण सभापती वंदनाताई गुजर, पाणलोट विभागाचे अतिरिक्त प्रकल्प अधिकारी डी.के.चौधरी, दिपक गुजर, छगन गुजर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तिन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अभियानाचे उद्देश, गाव निवडीचे निकष, पाण्याचे अंदाजपत्रक, कामाची देखभाल, हस्तांतरण, दुरुस्ती याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

तसेच विविध विषयांवर गट चर्चा होणार आहे. सूत्रसंचलन पूनम बेडसे यांनी केले. आभार संदिप धिवरे यांनी मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला आचार्य बागळे औरंगाबाद, बंडु आंबटकर अमरावती आदी प्रशिक्षक मार्गदर्शन करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*