राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची गुड्ड्याशी कोणत्या धंद्यात भागिदारी ?

0

धुळे । दि.8 । प्रतिनिधी-राष्ट्रवादीचा एक नगरसेवक गुड्ड्याला दररोज पाच हजार रूपये कसल्या भागिदारीचा हिस्सा म्हणून देत होता? असा सवाल आ.अनिल गोटे यांनी एका पत्रकातून उपस्थित केला आहे.

याबाबत आ.गोटे यांनी राष्ट्रवादीचे मनोज मोरे यांच्या पत्रकाला उत्तर देणारे पत्रक प्रसिध्दीला दिले आहे. त्यात म्हटले आहे की, की, पालिकेच्या वसूली विभागाचे 125 वर्षाचे दप्तर जाळून राख करणार्‍या गुडयाशी राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्याचे एवढे घनिष्ठ संबध ठेवण्यामागील कारण काय ?

17 जुलै रोजी गुड्ड्याने नेहरू चौकात उभे राहून कोणाचा उध्दार केला होता? महापालिकेच्या वसूली विभागाचे रेकार्ड जाळण्यासह गंभीर स्वरूपाचे 30 गुन्हे असणारा गुड्ड्या जिल्हा बँक अध्यक्षांच्या कार्यालयात का येत होता?

हत्याकांड होण्यापूर्वी किती दिवस आधी गुड्ड्या तुमच्या नेत्यांना भेटला होता ? शहरातीलच नव्हे तर, जळगांव, मालेगांव, नंदुरबार, नगर जिल्हात प्रचंड दहशत असतांना गुड्या तुम्हाला जवळचा का वाटत होता?

राष्ट्रवादीचे एक नगरसेवक गुडयाचोर यांस रोज पांच हजार रूपये देत असत. ही रक्कम कशासाठी दिली जात होती? नेमकी कशाची भागिदारी होती?असा सवाल पत्रकात आ. गोटे यांनी उपस्थित केला आहे.

 

LEAVE A REPLY

*