एसआयटी स्थापन हर्ष पोतदार अध्यक्ष

0
धुळे । दि.7 । प्रतिनिधी-येथील कुख्यात गुंड गुड्डया हत्याकांडप्रकरणी आयपीएस दर्जाचे अधिकारी हर्ष पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली असून यामध्ये आठ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे.
पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या एसआयटीमार्फत गुड्डया हत्याकांडाचा तपास केला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, कुख्यात गुंड गुड्डया हत्याकांड झाल्यानंतर पोलिसांनी बहुसंख्य संशयित आरोपींना गजाआड करण्यात यश मिळविले आहे.

यामुळे स्थानिक पोलिसांचे कौतुक केले जात असून उर्वरित आरोपीदेखील लवकरच गजाआड होतील, असा पोलिसांचा आत्मविश्वास आहे.

तपासाला अशा पध्दतीने गती आलेली असतांनाच सदरचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आला. तपासाबाबत अनुपालन अहवाल सादर करण्याबाबत गृहमंत्रालयाने आदेशही काढले आहेत.

तर आता मात्र हर्ष पोतदार या आयपीएस दर्जाच्या अधिकार्‍याकडे याप्रकरणी तपासाचे नेतृत्व देण्यात येत आहे. पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली आठ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

हर्ष पोतदार हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील कायद्याचे पदविधर असून त्यांनी अनेक मोठ्या जबाबदार्‍या सांभाळलेल्या आहेत. ते लवकरच धुळ्यात दाखल होणार असून तपासाचे सुत्र हाती घेणार असल्याचे समजते.

 

 

 

LEAVE A REPLY

*