आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बांधल्या राख्या

0

सोनगीर । दि.7 । वार्ताहर-येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी आश्रमशाळेतील पाचवी ते दहावीच्या सुमारे 50 विद्यार्थ्यांना राख्या बांधून व शैक्षणिक साहित्य वाटप करुन घालून येथील महिला दक्षता समिती व नेहरू युवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे रक्षाबंधन साजरा करण्यात आला.

येथे अनुसूचित जाती व नवबौद्धमधील गरीब पण फक्त विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा आहे. विद्यार्थ्यांना मोफत जेवण व निवासाची सोय आहे.

गावापासून लांब आलेले हे गरीब विद्यार्थी रक्षाबंधनासाठी आपापल्या गावात जावू शकत नाही. त्यांना त्यांच्या बहिणीची माया मिळावी म्हणून येथील महिला दक्षता समितीने त्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला.

त्यांना मिठाई वाटप केले. सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन आदी शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या रुपाली माळी म्हणाल्या की, छात्रालयातील मुलांबरोबर रक्षाबंधन साजरा करतांना अत्यंत आनंद झाला.

घरदार, आईवडील सोडून येथे ही मुले राहतात. त्यांना मायेची गरज आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन शैक्षणिक प्रगती साधावी.

दक्षता समितीच्या अध्यक्षा शकुंतला चौधरी म्हणाल्या की, रक्षाबंधनाचे पर्व साधून विद्यार्थ्यांनी आपल्याच नव्हे तर इतर सर्व बहिणींचे रक्षण करण्याची, त्यांना अडचणीत मदत करण्याची शपथ घेतली पाहिजे.

यावेळी दक्षता समितीच्या अध्यक्षा शकुंतला चौधरी, उपाध्यक्षा रुपाली माळी, सदस्या प्रतिभा लोहार, सुलभा ईशी आदी उपस्थित होत्या.

याशिवाय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे संचालक संदीप कासार, प्रा.डी.एच.धनगर व नेहरू युवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रविराज माळी, सचीव किशोर पावनकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*