बळसाणे । दि. 7 । वार्ताहर-मनाच्या गाभार्‍यात तील हळवा कोपरा असते बहीण काळजातून आलेला स्वर कापरा असते बहिण आई जपते पदरा आड करित मायेचे पखरण तिच्या मागे उरलेला मायेचा आसरा असते,

बहिण अशा बहिण भावाच्या पवित्र प्रेमाचा आविष्कार घडविणारा राखीचा सण रविवार रोजी अकरा भावांची लाडकी ताई नाशिक येथील चंद्रकला बुरड यांच्या राहत्या घरी अकरा भावांसह वहिनींना आग्रहाचे आमंत्रण देऊन मोठ्या उत्साहात एकुलती एक बहिणीकडे राखी सण साजरा करण्यात आला .

सण हा राखीचा आला झुले आनंदाचा झुला अकरा भावांची जोडी येई घरा बांधावया राखी करा अशी भावना ऋदायात जपत सासरी नांदणार्‍या बहिणीचे डोळे भावाच्या वाटेवर लागले होते राखीच्या निमित्ताने भाऊ भावजायांची एकंदरीत भेट होणार असून माहेरची ख्याली खुशाली कळाली बहिणीने भावांना भावजायांना पाहून एकही भाऊ बहिणीला विसरला नाही याची खात्री बहिणी ला पटली 45 वर्षाने माझ्या काकांची मुल , माझे भाऊ , भावजायी रक्षाबंधन निमित्ताने एकंदरीत जमले .

माझ्या कुटुंबातील सदस्यांना तो क्षण अवस्मरणीय राहिल असे बहिण चंद्रकला बुरड यांनी सांगितले बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या हा राखीचा धागा आयुष्यभर त्यांना एकमेकांशी जोडून ठेवण्यात यशस्वी ठरत आला आहे .

राखी बांधणार्‍या बहिणीची रक्षा करण्याचे कर्तव्य भावांना शेवटपर्यंत पार पाडावे लागते व तसे ते अनेक भावांनी पार पाडल्याचे ईतिहासात ही सापडतात .

तिघी परिवाराचे भाऊ व वहिनी धकाधकीच्या जीवनात सर्व जमून राखीचे औचित्य साधून माझ्या घरी आले राखीचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला यागोष्टी चा आनंद मला सदैव राहील कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माझ्या मुलांनी व सुनांनी परिश्रम घेतले

 

LEAVE A REPLY

*