हस्ती बँकेतर्फे मृत्यूंजय योजनेला मुदतवाढ

0

दोंडाईचा । दि.5 । वि.प्र.-उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दि.हस्ती को-ऑप. बँकेतर्फे सभासदांसाठी राबविण्यात येत असलेल्या मृत्युंजय योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत समावेश असलेल्या मयत सभासदांच्या वारसांना रु.10 हजारांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येते. बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांपर्यंत मयत सभासदांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती बँकेचे ज्येष्ठ संचालक मदनलाल जैन यांनी दिली.

हस्ती बँकेचे आधारस्तंभ खान्देशरत्न कांतीलालजी जैन यांनी बँकेसोबतच सामाजिक दृष्टिकोनातून मृत्यंजय योजनेची सन 1989 पासून सुरवात केली होती.

या योजनेअंतर्गत समावेश असलेल्या मयत सभासदांच्या वारसांवरील आर्थिक भार हलका करण्याच्या उद्देशाने रु.10 हजारांपर्यंतची मदत देण्यात येते.

मृत्युंजय योजनेला सुरवात झाल्यापासून नियोजित मुदतीनूसार ही योजना सन 2018 मध्ये संपणार होती. मात्र सभासदांच्या आग्रहास्तव व सामाजिक दृष्टिकोनातून बँकेचे आधारस्तंभ कांतीलालजी जैन यांच्या मार्गदर्शनानूसार मृत्यंजय योजनेला बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

योजनेच्या सुरवातीपासून आतापर्यंत 926 मयत सभासदांच्या वारसांना रु.81 लाख 45 हजार 500 रुपयांची मदत देण्यात आली आहे.

आमची प्रतिज्ञा, तुमची प्रगती बँकेच्या या ब्रिदवाक्याप्रमाणेच सभासदांसोबतच त्यांच्या कुटूंबियांच्या हितासाठी बँक कटिबध्द आहे.

बँकेचे सभासद व ग्राहकांना सर्वोत्तम व अत्याधुनिक सेवा पुरविण्यासाठी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया, जनरल मॅनेजर माधव बोधवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रयत्नरत असल्याचे अध्यक्ष कैलास जैन यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*