मुख्यमंत्री साहेब, मी ‘बळी’राजा बोलोय .. सांगलीच्या विजय जाधव यांचे कडक लक्ष्मी आंदोलन

0
धुळे | प्रतिनिधी : मुख्यमंत्री साहेब, मी ‘बळी’ राजा बोलतोय, जून २०१७ पर्यंतच्या शेतकर्‍यांना कर्जातून मुक्त करा हो, घातक व्यसनांंना मुक्ती द्या अन् महिलांना सुरक्षेचा ठेवा द्याहो… सप्पाक… सप्पाक…. कडक लक्ष्मी सांगते एैका हो…. अशा सुरात सांगलीच्या बळीराजा शेतकरी संघाचे प्रवक्ते विजय जाधव यांनी पाठीवर कोरडे ओढत तर पायातील घुंगरू वाजवून आर्जव करत आहेत.

कडक लक्ष्मीचा वेश परिधान करून पायातील झुंघरांच्या तालावर नाचत अंगावर चाबकाचे फटके मारून घेत मुख्यमंत्री साहेबांना आर्जव करत आहेत.

जेथे जातील तेथे त्यंाच्या मागण्यांचे एक कार्ड ते लोकांना वाटत आहेत.

त्यांच्या या कार्डातील निवेदन असे : मुख्यमंत्री साहेब मी ‘ बळी’ राजा बोलतोय, आमच्या सामाजीक मागण्या मान्य करा. जून २०१७ पर्यंत शेतकर्‍यांना कर्जमुक्ती द्या,सन २०११ पूर्वीची थकीत कर्जाची वसुली थांबवा.

कर्जमुक्त होणार्‍य शेतकर्‍यांना शेत वीज बीलही माफ करा. डॉ. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा. नियमित कर्ज भरणार्‍यांना १०० टक्के लाभ द्या. लोकांच्या आरोग्यास घातक व्यसनांच्या उत्पादनासह विक्रीवर पूर्णपणे बंदी आणा. महिलांना सुरक्षित राहण्यासाठी कायद्याची कडक अंमलअजावणी करा..

..मुख्यमंत्री साहेब मी ‘बळी’ राजा बोलतोय.

विजय जाधव यांच्या या कडक लक्ष्मीच्या रूपाने चालविलेल्या अभिनव आंदोलनाची मुख्यमंत्री दखल घेतात काय याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*