‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर फुलले हसू !

0
कापडणे । दि.4 । प्रतिनिधी-सोशल मिडियाच्या वापरातुन तंटे-बखेडे निर्माण झाल्याची व त्यातुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिल्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात.
असे असतांना ह्याच सोशल मिडियाने मात्र येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हसू फुलविण्याचे आशादायक काम केले आहे.
येथील जि.प.शाळा क्र.4 मधील तब्बल 80 विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शालेत साहित्यांची थेट मदत मिळाली आहे. सोशल मिडीयाच्या या सदुपयोगाचे कापडणे परीसरातुन कौतुक होत आहे.

पुणे येथील एका नामांकित कंपनीत नोकरीस असलेल्या निलेश पिंगळे या तरुण अभियंत्याची येथील जिल्हा परिषद शाळा क्र. 4 च्या शिक्षिका स्मिता सराफ यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातुन ओळख झाली.

दरम्यान या सराफ मॅडमांनी या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या या फेसबुक फ्रेंडजवळ मांडल्या. या अभियंत्याने याची तत्परतेने दखल घेतली व पुणे येथील अविरत फाऊंडेशन च्या माध्यमातुन शाळेतील 80 आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट म्हणुन दिले

ही मदत देण्यासाठी निलेश पिंगळे या अभियंत्याने थेट पुण्याहून कापडणे गाठले. येथील शाळेत येवुन तब्बल 80 मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले.

यात दप्तर, वॉटर बॅग, पेन्सिल किट, वह्या, कंपास आदी वस्तुंचा समावेश आहे या मदतीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर हसू उमटले आहे या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्षस्थानी मदत करणारे निलेश पिंगळे होते यावेळी शाळेतील शिक्षिका स्मिता सराफ यांनी आदिवासी विद्यार्थ्यांनी शाळेत केलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली.

या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाला केंद्र प्रमुख श्री.खैरनार, विद्या जाधव, हर्षदा बोरसे, स्मिता सराफ आदी उपस्थित होते.

 

 

 

LEAVE A REPLY

*