खासगीकरणाला वीज कर्मचार्‍यांचा विरोध

0

धुळे । दि.3 । प्रतिनिधी-वीज वितरण कंपनीने उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी फ्रेंचाईशी देण्यात आली असून हे धोरण कर्मचार्‍यांवर अन्याय करणारे आहे.

कंपनीच्या या निर्णयाला कर्मचार्‍यांकडून विरोध होत आहे. यासंदर्भात धुळे येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आज संयुक्त कृती समितीतर्फे द्वारसभा घेण्यात आली. यावेळी खाजगी करणाला कडाडून विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

झालेल्या द्वारसभेत एस.ई.ए. संघटनेचे आर.सी. चितोडकर, एस.एस. महाजन, वर्कस् फेडरेशनचे बी.डी. पाटील, नाना किसन पाटील, मागासवर्गीय संघटनेचे पी.बी. जगदेव, एस.ए. बोरसे, भारतीय मजदूर संघाचे बी.एन. पाटील, चतुर सैंदाणे, विद्युतक्षेत्र कामगार संघटनेचे एन.एम. खाटीक, प्रवीण पाटील, इंटक संघटनेचे नंदु बडगुजर, अशोक पारोळेकर, बहुजन फोरमचे आर.पी. महाले उपस्थित होते.

धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिरपूर, दोंडाईचा, साक्री, पिंपळनेर याठिकाणचे संघटनांचे पदाधिकारी तसेच 200 ते 300 सभासद या द्वारसभेला उपस्थित होते. यावेळी कर्मचार्‍यांना पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले. वीज वितरण कंपनीने खासगीकरण केल्यास कडाडून विरोध केला जाईल अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*