विखरण पाझर तलावात पाण्याचा ठणठणाट

0
विखरण |  वार्ताहर :  पावसाळ्याचे दोन महिने लोटले तरी विखरण पाझर तलावात पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे.
विखरण देवाचे येथील पाझर तलाव शिंदखेडा तालुक्यातील सर्वात मोठा आहे.

या तलावातील जलसाठ्यामुळे परिसरातील कामपुर मेथी, वरझडी, हातनुर, भडणे, साळवे, सोनशेलु, जोगशेलु, रहिमपुरे, विखुले, चौगाव, बाम्हणे, चिलाणे, विरदेल, शिंदखेडा, परसामळ, धमाणे, दाउळ, मंदाणा, दोंडाईचा, खर्देे, मांडळ, अंजनविहिरे आदी गावांना वरदान ठरणारा तलाव आहे.

या तलावातील जलसाठ्यामुळे शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो पावसाळ्याचे दोन महिने लोटले तरी आतापर्यंत तलावात पाण्याचे साधे डबके सुध्दा भरले नसल्याने भविष्यातील पाणी टंचाई समस्या भेडसावणयाची चिंता व्यक्त होत आहे.

येथील तलावात पाण्याचा साठा झाला नाही तर विहिरीना पाझर फुटणार नाही म्हणून पिकांना पाणी कसे देणार महागड्या बि बियाणासाठी व्याजाने उसणवारीने आणलेल्या पैशाची परत फेड कशी करणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विखरण पाझर तलाव हा जलसाठ्याने पुर्ण भरावा म्हणून विखरण परिसरातील नागरिक जोरदार पावसाची आज सुध्दा प्रतिक्षा करित आहे आणि पिण्यासाठी मिळेल तेथून पाणी ऊपलब्ध करून घेत आहेत.

LEAVE A REPLY

*