अवैध शस्त्रे बाळगणार्‍यावर धुळे पोलिसांची कारवाई

0
धुळे | प्रतिनिधी : धुळे शहरात चंद्रमणी चौक वडजई रोड धुळे येथे विनापरवाना अवैधरित्या तीन गावठी पिस्तूल, तिन जिवंत काडतुस, एक लोखंडी रॉड, बेस बॉल दंडा असे शस्त्र बाळगणार्‍या पवन दिलीप वाघ ( वय २९, रा. चंद्रमणी चौक) यांस पोलिसांनी रंगेहात पकडले.

पोलिस अधिक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे यंाच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, सपोनि पी.जे. राठोड, पोसई नरासीर पठाण, पोसई दिलीप माळी, पोहेकॉ जितेंद्र आखाडे,संदीप थोरात आरीफ शेख,पोना नितीन मोहने,गाृतम सपकाळे,विजय मदाने, मायुस सोनवणे, चेतन कंखरे,मनोज बागुल, कविता देशमुख, कल्याणी पाटील यांनी त्यास ताब्यात घेतले.

त्याच्यावर चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*