पाझर तलावाचे जवाहर ट्रस्टतर्फे पुनरुज्जीवन

0

धुळे / सन 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात बांधलेल्या काळखेडा येथील पाझर तलावाचे जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्या माध्यमातून पुर्नजीवन होते असून त्यामुळे काळखेडेसह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनासाठी फायदा होणार आहे.

यावेळी येथील शेतकर्‍यांनी सन 1972 च्या भीषण दुष्काळाच्या आठवणी ताज्या केल्यामुळे दुष्काळाची दाहकता काय असते ते त्यांच्या भावनेतून जाणवत होते.

धुळे तालुक्यातील काळखेडे येथील गायमुख धरणाच्या पुर्नजीवनाच्या कामाचा माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

धुळे तालुक्यात आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्यामाध्यमातून विविध ठिकाणी पाझर तलाव, साठवण बंधारे तसेच नाला खोलीकरण,रुंदीकरण करणे, गाळ काढणे, नदी पुर्नजीवीत करणे अशी सिंचनाची कामे वेगाने सुरू आहेत.

या कामांमुळे येणार्‍या काळात दुष्काळ हद्दपार होवून धुळे तालुक्याचा कायापालट होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*