15 डंपरवर कारवाई

0

जळगाव / जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या आदेशावरुन महसूल विभागाने गेल्या तीन दिवसांत पंधरा वाळूच्या अवैध डंपरवर कारवाई केली असल्याने वाळु वाहतुक करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

यावेळी कागदपत्र पूर्ण असलेल्या डंपर चालकांवर कारवाई करण्यात येत असल्याने वाळु ठेकेदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला होता.

प्रांताधिकारी तथा सहाय्यक उपजिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अवैध वाळु वाहतुक करणारी चार वाहने आज पकडली.

यावेळी वाहन चालकांजवळील पावत्यावर दिसून आली. एकाच पावतीवर ही खाडाखोड केल्याने जलज शर्मा यांनी सर्व वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले.

यामुळे वाळू वाहतूक करणार्‍यांमध्ये असंतोष होऊन, आमच्यावर अन्याय का ? अशा विचारणा ते करीत होते. शर्मा यांनी सांगितले की, ज्यांच्याजवळ वाहन पकडल्यानंतर नियमानुसार पावत्या असतील त्यांना सोडण्यात येईल.

मात्र ज्यांच्याजवळ खाडाखोड केलेल्या, बनावट पावत्या असतील त्यांच्यावर दंडाची, बंधपत्राची गरज पडल्यास गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल.

सावखेडा, फुफनगरी, नागझिरी, बांभोरी या परिसरातून वाळूची अवैधरित्यावर वाहतूक करणार्‍यांवर ही कारवाई करण्यात आली.

तहसील कार्यालयाच्या महिला पथकानेही वाहने पकडली. नायब तहसीलदार रूपाली काळे,सी.एम. कोळी, तलाठी तायडे, तलाठी किरण सपकाळे, सारिका र्दुगूडे, मनीषा माने यांच्या पथकाने कारवाई केली.

LEAVE A REPLY

*