केंद्रीय रेल्वेमंत्री ना.सुरेश प्रभू 29 ला धुळ्यात

0
धुळे । दि.19 । प्रतिनिधी-प्रस्तावित मनमाड-धुळे इंदौर रेल्वे मार्गासाठी ना.डॉ. सुभाष भामरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळविली आहे.
या रेल्वे मार्गाची पुढील प्रक्रिया वेगाने कार्यान्वित व्हावी म्हणून गेल्या अनेक दिवसापासून ना.डॉ. सुभाष भामरे हे केंद्रीय रेल्वे मंत्री ना.सुरेश प्रभू यांना धुळे भेटीसाठी आग्रह करीत होते. त्यानुसार ना.सुरेश प्रभू यांनी दि.29 जुलै रोजी धुळे येथे येण्याचे निश्चित केले आहे.
गेल्या 30 वर्षात ना. सुरेश प्रभू हे पहिले रेल्वे मंत्री आहेत की, जे धुळे वासियांचे गेल्या अनेक वर्षापासुनचे प्रलंबित असलेले मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या स्वप्नपूर्तीची भेट देण्यासाठी धुळे येथे येत आहेत.

व त्यासाठीच ना.डॉ.सुभाष भामरे यांनी ना.सुरेश प्रभू यांना प्रत्यक्ष धुळे येथे येऊन धुळेकरवासियांना ही अमूल्य भेट द्यावी म्हणून आग्रह धरला.

व या आग्रहाचा मान राखून ना.सुरेश प्रभू हे 29 जुलै रोजी धुळे येथे येत आहेत. मनमाड धुळे-इंदूर रेल्वे मार्गासाठी ना. डॉ.सुभाष भामरे यांनी सातत्याने रेल्वे मंत्रालय, रेल्वेचे विविध अधिकारी तसेच मंत्री महोदयांना वारंवार बैठका घेऊन पाठपुरावा केला.

त्यामुळेच समस्त धुळे वासियांचे हे स्वप्न साकार होत आहे. ना. सुरेश प्रभू हे सदरच्या धुळे बैठकीदरम्यान संबंधित रेल्वेच्या सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन या विषयासंदर्भात प्रगतीचा आढावा घेणार आहेत.

तसेच मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामास लवकरात लवकर सुरुवात होण्याच्या दृष्टीकोनातून संबंधित रेल्वे अधिकार्‍यांना सूचनादेखील करणार आहेत.

गेल्या अनेक दिवसापासूनचा प्रलंबित असेलेला मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचा प्रश्न ना.डॉ.सुभाष भामरे यांच्या अथक प्रयत्नाने लवकरच मूर्त स्वरुपात येणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*