मुख्यमंत्री घेणार आढावा बैठक

0

धुळे / मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि.17 मे रोजी जिल्ह्यात येत असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

शिंदखेडा येथे दुपारी दोन वाजता ही बैठक होणार असून या बैठकीमध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गावांची 100 टक्के कामे पूर्ण करणे, मागेल त्याला शेततळे, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण व नागरी योजनेचा आढावा प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा, पिककर्ज पुर्नगठणाचा आढावा, तूर खरेदीचा आढावा घेण्यात येणार आहे.

यावेळी सर्वात कमी कामगिरी असलेल्या दोन गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.

सदर दौर्‍यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस हे जलयुक्त शिवार योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामांची पाहणी करतील.

या बैठकीसाठी पालकमंत्री, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, मुख्याधिकारी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता, विज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, लघुसिंचन विभागाचे अभियंता, जिल्हा बँकेचे अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

*