मोटरसायकल अपघात आजोबा ठार, नातू जखमी

शिंदखेडा । दि.12 । प्रतिनिधी-मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेमूळे एक जागीच ठार तर अन्य तिन गंभिर जखमी झाले.जखमींना धुळे येथील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज येथील स्टेशनरोड लगतच्या व्ही.के.पाटील शाळेसमोर दुपारी तिनच्या सुमारास हा अपघात झाला.
शिंदखेडा तालुक्यातील दरखेडा येथील श्रावण नारायण पाटील (वय 60) असे मृत शेतकर्‍यांचे नाव आहे.
आज दुपारी शिंदखडा तालुक्यातील अलाणे येथील शेतकरी भगवानसिंग जगतसिंग गिरासे आणि त्यांचा नातू दिपपालसिग लोटनसिंग गिरासे हा शिंदखेडा येथे आले होते.

शिंदखेड्याहून एमएच 18 एम. 8243 या क्रमांकाच्या मोटरसायकलने अलाणे येथे जात असतांना दरखेडा येथील शेतकरी श्रावण नारायण पाटील (वय 60) हे लंघाणे येथील त्यांचा नातू रामकृष्ण अनिल पाटील (वय 18) यांच्यासह एमएच 18 एजी 9460 या क्रमांकाच्या मोटरसायकलने दरखेडा येथून शिंदखेडाकडे जात होते.

दोन्हीं मोटरसायकली नातूच चालवत होते. येथील स्टेशन रोडलगतच्या व्ही.के.पाटील शाळेजवळ या दोघां मोटरसायकल समोरासमोर एकमेकींना धडक दिल्याने यात दोघा मोटरसायकलचे पुढील चाक पूर्णपणे वाकून गेले.

तर दोन्ही गाड्यांवरील आजोबांसह नातूही अंतरावर फेकले गेले होते. यावेळी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.यात श्रावण पाटील यांचे जागीच निधन झाले.

अन्य तीन जण गभीर जखमी झाले आहेत. रस्त्याने जाणार्‍यांनी जखमींना शिंदखेडा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते.

मात्र जखमीची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना धुळे येथील खाजगी रूग्णालयात नेण्यात आले.

या घटनेची शिंदखडा पोलिसात नोंद करण्यात आली असून रात्री उशिरा श्रावण पाटील यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, तिन मुली एक मूलगा असा परीवार आहे.

 

LEAVE A REPLY

*