नियमीत तपासणी होत नसल्याने भेसळ सम्राटांना अभय

0
शहादा |  ता.प्र.:  अन्न पदार्थातील भेसळ शोधून संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी आणि भेसळ बाजारात अंकुश निर्माण करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर असतांना अधिकारी कारवाई करीत नाही. अन्न पदार्थातील तपासणी वेळेवर होत नसल्याने भेसळ सम्राटांना अभय मिळत आहे.

शहरात ग्रामीण भागात उघड्यावर अन्न भेसळ पदार्थाची सर्रास विक्री होते. तयार केलेल्या खाद्य पदार्थावर कुठलेही झाकण नसते. अन्नावर माश्या, डास वावर करतात ते खाल्लयाने आरोग्य धोक्यात येते.

तालुक्यात अन्नभेसळ पदार्थाचे नमुने घेणारे सक्षम अधिकारी नाहीत. जिल्ह्याच्या ठिकाणी एक अधिकारी काम पाहतो. त्यामुळे उघड्यावर अन्न विकणार्‍या दुकानदारांना फोफावते.

जिल्हास्तरीय अधिकारी यांनी वर्षभरातून किती दुकानांवर अन्न भेसळ पदार्थाचे नमुने घेत चाचणी करून प्रयोगशाळेत पाठविले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अन्न पदार्थातील भेसळ शोधून संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी व भेसळ बाजारावर अंकुश निर्माण करण्याची जबादारी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी उघड्यावरील पदार्थाचे नमुने घेत प्रयोग शाळेत पाठविणे क्रमप्राप्त आहे.

पूर्वीच्या अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार चाचणी अहवाल प्रयोगशाळेने ४० दिवसात देणे बंधनकारक होते. मात्र सध्या त्यात बदल होत १४ दिवसांवर आणला आहे. एफडीएच्या अधिकार्‍यांना किमान दोन-तीन महिने प्रतीक्षा करावी लागते.

नंदुरबार जिल्ह्यात या वर्षभरात अथवा आज पावतो किती दुकांनावरून पदार्थाचे नमुने घेत प्रयोगशाळेत तपासणीस पाठविले आहेत. दहा ते वीस टक्केच नमुन्याचा अहवाल येतात ८० टक्के या अहवाल अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने गुलदस्त्यात राहतो.

अहवाल येत नसल्याने पदार्थात भेसळ आहे किंवा नाही हे समजणे दुरापास्त होते. तेथूनच लोकांच्या आरोग्याची धोक्याची घंटी वाजते. एखादी दुर्घटना झाल्यानंतर त्या पदार्थाची तपासणी करिता प्रयोगशाळेत पाठविले जाते, त्याचा अहवाल येईपर्यंत या पदार्थाची विल्हेवाट तथा प्रकरण रफादफा होतांना दिसते.

अन्न पदार्थाचे नमुन्यांचे विश्लेषण व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नसल्याचे दिसते. बर्‍याच वेळा प्रयोगशाळेतून अहवाल वरून गत दिवसांचा तारखा टाकून अहवाल दिला जात आहे. त्यात सारवासारव, गोंधळ होतो असे अधिकार्‍यांच्या चर्चेतून कळते.

अन्न पदार्थातील भेसळ तपासणी व त्यांचा अहवाल प्राप्त करून संबधीतांवर कारवाईचा बडगा उचलण्यासाठी स्थानिक व जिल्हा अन्न व औषध भेसळ अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे भविष्यात एखाद मोठी घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

*