गंभीर गुन्ह्यातील हरियाणाच्या आरोपीस साक्रीमध्ये अटक

0
 धुळे । दि.8 । प्रतिनिधी-गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेला हरियाणातील नरेंद्र जाट यास हरियाणा रेल्वे पोलिसांनी आज (दि.9) साक्री येथून अटक केली.
गेल्या दोन आठवड्यांपासून हरियाणा पोलीस जाट याचा शोध घेत होते. मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांनी त्याचा तपास करून आज ताब्यात घेतले.
दि.22 जून 2017 रोजी हरियाणात एका 16 वर्षीय मुलाची गाजीयाबाद-मथुरा ईएमयु या ट्रेनमध्ये हत्या करण्यात आली होती.

याप्रकरणी दि. 23 जून रोजी संशयीत आरोपी नरेंद्र इंद्रसिंग जाट (वय 25) रा.बामरोला जि.पल्लवल (हरियाणा) याच्यावर फरिदाबाद येथील पोलिस ठाण्यात कलम 147, 149, 298, 323, 324, 114, 307, 302, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाट याचा हरियाणाचे पोलिस गेल्या पंधरा दिवसांपासून शोध घेत होते. मोबाईल लोकेशनच्या आधारे जाट हा धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात असल्याचे हरियाणा पोलिसांना स्पष्ट झाले.

त्यानंतर हरियाणाची पोलीस यंत्रणा आज साक्रीमध्ये दाखल झाली. दोन दिवस पोलिस मागावर होते. त्यानंतर आज नरेंद्र जाट पोलिसांनी ताब्यात घेतले.

नरेंद्र जाट यास ताब्यात घेतल्यानंतर साक्री पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. दुपारी 1 वाजता जाट यास साक्रीत अटक केल्यानंतर दीड वाजता सुरत येथे नेण्यात आले.

तेथून विमानाने हरियाणा पोलिस जाट यास घेऊन रवाना झाले. दि. 9 जुलै रोजी जाट यास संबंधित न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लोकेशनच्या आधारे तपास


हरियाणात घडलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील नरेंद्र जाट हा आरोपी आहे.हरियाणा पोलिस त्याच्या शोधात होते. या दरम्यानच्या काळात जाट हा कामाच्या शोध घेण्याचा बहाणा करून साक्रीत आला होता. हरियाणा पोलिसांना मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा ठिकाणा समजलेला होता. त्यानुसार ते साक्रीत आले आणि आज त्यांनी जाट यास अटक केली. या कारवाईसंदर्भात त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली.
– एम.रामकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे

 

 

LEAVE A REPLY

*