तीन ठार : तिघे जखमी

0

साक्री / तालुक्यातील इच्छापूर गावाजवळ सुरत-नागपुर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या नादुरूस्त ट्रॅक्टर ट्रालीला मारुती ओमीनी व्हॅनने जोरदार धडक दिली. यात धुळे येथील तिघांचा जागीच मृत्यु झाला आहे.

या घटनेचे सविस्तर वृत्तांत असे की, धुळे येथील शेख परिवारातील सहा सदस्य दि 7 रोजी मारुती ओमीनी व्हॅनने मुलगी पाहण्यासाठी तालुक्यातील पिंपळनेर गावात गेले होते.

मुलगी पाहून रात्री उशिरा धुळे जाण्यास निघाले असता रात्री 11:30 वाजता इच्छापुर गावाजवळ टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीला (एम एच 18 एन 2854) ओमीनी व्हॅनने (एम एच 17 ए ई 2018) पाठीमागून जोरदार धडक दिली.

यात व्हॅनचा मोठा अपघात होवून युसूमशेख नथ्थू (वय 75, रा. बिस्ती गल्ली बारापत्थर, धुळे), शेख असिम शेख युसूफ(वय 49 रा. जुना नाका वडजाई रोड, धुळे) व साजनबी शेख अस्लम (वय 40, रा जुना नाका वडजाई रोड, धुळे) या तिघांचा जागीच मृत्यु झाला. तसेच शेख नासिम शेख गुलाब(वय 70, तिरंगा चौक झोपडपट्टी, धुळे), शेख आबेदाबी शेख नासिर (वय 65, तिरंगा चौक झोपडपट्टी, धुळे) व शेख निजार सुलमान शेख आसिम(वय 40, बिस्ती गल्ली गं.नं.2 बारापत्थर,धुळे) हे तिघेही जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची फिर्याद शेख उस्मान शेख बन्नू (वय 52, बिस्ती गल्ली गं नं 2 बारापत्थर, धुळे) यांनी दिली असून ट्रॅक्टर चालकाविरोधात विरोधात भादंवि कलम 304 (अ), 279, 337, 338, 427 नुसार व मो.वा.का.क. 110, 122 व 177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अतुल तांबे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*