डॉ. गुप्ता यांना युकाँचा घेराव

0

धुळे / जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आज सर्वोपचार रुग्णालयातील समस्यांबाबत अधिष्ठाता एस.एस.गुप्ता यांना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी घेराव घालण्यात आला.

गेल्या 10 ते 15 दिवसांपासून सर्वोपचार रूग्णालयाचे सिटीस्कॅन मशीन बंद आहे. रुग्णांना येथे बोलावून सिटीस्कॅन मशिन बंद असूनही उद्या परत या, असे सांगून रोज परत पाठवून दिले जात होते.

गेल्या सात ते आठ दिवसांपासून चकरा मारत असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी युवक काँग्रेसकडे फोनवरुन तक्रार केली आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते तेथे धडकले.

कार्यालयीन अधीक्षक डॉ.डांगे यांनी सुरुवातीला कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडे कुठलेही ठोस आश्वासन नसल्यामुळे त्यांनी तेथून काढता पाय घेतला.

युवक काँग्रेसने आपला मोर्चा डॉ.गुप्ता यांच्या दालनाकडे वळविला आणि त्यांच्या दालनातच त्यांना अनेक प्रश्नांचा भडीमार करत घेराव घातला.

लवकरात लवकर सिटीस्कॅन मशिन दुरुस्त करुन रुग्णांना ताबडतोब रिपोर्ट दिला यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ.एस.एस.गुप्ता यांनी मी शासनाकडे वारंवार मागणी करीत आहे, मात्र शासन याबाबत उदासीन आहे. मी काय करू? असे हतबल झाल्यासारखे उत्तर दिले.

त्यांनी त्याचे पुरावे ही युवक काँग्रेसला दाखविले. शासन आणि प्रशासन हे यामुळे एकमेकांकडे बोट दाखवत आहे. यामुळे रुग्णाला होणार्‍या त्रासाला जबाबदार कोण? याला आजतरी उत्तर सरकार व रुग्णालय प्रशासनाकडे नाही.

 

LEAVE A REPLY

*