राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

0

धुळे / छत्रपती शिवरायांची प्रतिमा पायदळी तुडविणार्‍याला पक्षात प्रवेश दिल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज शहरात निदर्शने करण्यात आली.

शहरातील मनोहर चित्रमंदिरजवळील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी यावेळी आ. राजवर्धन कदमबांडे, महापौर सौ.कल्पना महाले, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष मनोज मोरे, मनपा स्थायी समितीचे सभापती कैलास चौधरी, कमलेश देवरे, नवाब बेग मिर्झा, दयांनद मेहता, लाला छाजेड, शिवा पवार, दिलीप उपाध्य, रवी रणसिंग, राजु बोरसे, सत्तार शहा, साहेबराव देसाई, लहु पाटील, सव्वाल अन्सारी, गुलशन उदासी, सुभाष बाबर, दादा देवकर, संजय वाल्हे, दिनेश पोतदार, शकील ईसा, निलेश गवळी, मयुर शर्मा, रजनिश निंबाळकर, रणजित राजे भोसले, वाल्मीक जाधव, अरुण पवार, गणेश चौधरी, सत्यजित सिसोदे, मुन्ना शितोळे, यशवर्धन कदमबांडे, सचिन आखाडे, जावेद बिल्डर, गणेश जाधव, भानुदास पारोळेकर, किरण आगलावे, कुणाल पवार, असीम शहा, अजीज शेख, अशफाक शहा, कांतीलाल दाळवाले, सुनिल भदाणे, आशिष चव्हाण, प्रमोद सांळुखे, समाधान शेलार, भरत जाधव, ललीत कोरके, अंसख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपाचा निषेध करण्यात आला. माजी आ. यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

‘त्या’ गुंडावर कारवाई करा-मनोज मोरे


छत्रपती शिवरायांची प्रतिमा पायदळी तुडवणारा कोण? ‘त्या’ अज्ञात गुंडावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष मनोज मोरे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात मोरे यांनी म्हटले आहे की, भाजपा धुळे महानगरतर्फे कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौर्‍यानिमित्त नियोजन व पक्ष प्रवेश देण्याबाबत चर्चा झाली. त्यात आ.अनिल गोटे यांनीदेखील मार्गदर्शन केले.

यावेळी आ.गोटे यांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा पायदळी तुडवितांनाचे संबधित गुंडाचे फोटो आपल्याकडे असल्याचे म्हटले आहे. आ.गोटेंनी केलेल्या या वक्तव्याकडे भाजपाचे पदाधिकारी व नेत्यांनी साफ दुर्लक्ष केले.

2008 च्या दंगलीनंतर एका वाहिनीवर आ.गोटेंनी मुलाखत देतांना असाच एक गौप्यस्फोट करून ‘सदरची दंगल पूर्वनियोजित होती व दंगल होणार हे मला आधीच माहिती होते.’ असे त्यांनी मुलाखतीत सांगीतले होते.

दंगलीची पूर्वकल्पना आ.गोटेंनी पोलीस प्रशासन अथवा जिल्हा प्रशासनास अगोदरच दिली असती तर कदाचित धुळ्यात दंगल झाली नसती.

आता भाजपाच्या बैठकीमध्ये आ. अनिल गोटे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शिवरायांची प्रतिमा पायदळी तुडविणारा कोण? ‘त्या’ अज्ञात गुंडावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*