देवपुरातील दारुचे दुकान हटवा : आयुक्त देशमुख यांना रहिवाशांचे निवेदन

0
धुळे |  प्रतिनिधी : देवपुरातील प्रभाग क्र.६ मध्ये अतिक्रमण जागेवर असणारे दारुचे दुकान हटवा, या मागणीसाठी आज मनपाचे आयुक्त देशमुख यांना स्थानिक रहिवाशांनी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.६ मध्ये सिटी सर्व्हे क्र.६५/१ या प्लॉटमधील बिअरबार सुरु आहे. या बिअरबारला परवानगी देवू नये. सदरील रहिवाशांना राहण्यासाठी जागा देण्यात आली होती.

मात्र, त्यांनी या जागेवर बिअरबार व्यवसाय सुरु केला आहे. तरी या व्यवसायाला स्थानिक नागरिकांचा विरोध असून मनपाने बिअरबारला परवानगी देवू नये, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर नगरसेविका वैभवी दुसाने, वैशाली पाटील, पुष्पलता जोशी, सरिता वाणी, मनिषा चौधरी, मेघना चौधरी, आशा सोनवणे, संध्या पाटील आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

*