शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे कुक्कुट पालन प्रकल्पाचा शुभारंभ

0
तर्‍हाडी |  वार्ताहर :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतून शिरपूर तालुक्यातील खैरखुटी, जामन्यापाडा बुडकी, चाकडू या गावांमध्ये प्रकल् मंजूर करण्यात आले.

येथील गावातील बचत गटाला १००टक्के अर्थसहाय्यावर कुक्कुटपालन मंजूर करण्यात आले. त्यात खैरखुटी येथे कुक्कुटपालन प्रकल्पांचे उद्घाटन आ. काशिराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अदिकारी बाळासाहेब जैन, वरीष्ठ जिल्हा समन्वयक अरविंद गोरे, एच.बी.चौधरी, बालकिसन पावरा, ललिता माळी, जयेश जगताप उपस्थित होते.

त्या कुक्कुटपालन प्रकल्पामुळे शिरपूर तालुक्यातील बचतगटागतील महिला सक्षम होण्यास मदत होईल व त्याचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल. असे मत आ. काशिराम पावरा यांनी मांडले या योजनेचा बचतगटातील लाभ घेण्याचे आवाहन त्यावेळी त्यांनी केले.

LEAVE A REPLY

*