धरमखोयी नाल्यातून गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ

0
शिरपूर |  प्रतिनिधी :  शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील धरमखोयी नाल्यातील गाळ काढण्याच्या कामास प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल, आ.काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने थाळनेर येथील धरमखोयी नाल्यात दि. ६ जून रोजी दुपारी १२ वाजता गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.

यामुळे या नाल्यात २.८३ कोटी लिटर पाणी साठा आहे. तसेच धरमखोयी नाल्यात जे शिरपूर पॅटर्न अंतर्गत काम सुरु आहे त्यामुळे ३६०० कोटी पाणी साचणार असल्याची माहिती देण्यात आली. या नाल्यातील गाळ शेतकरी बांधवांच्या शेतात टाकून शेती सुपीक करण्याचा दुहेरी फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे.

अनेर डॅम सेक्शन इंजिनिअर टी.आर.दोरीक, लघु प्रकल्प् ज्युनिअर इंजिनिअर हितेश भटूरकर यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली. उपस्थित अनेक मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढविण्यात आले.

येथील साठवण बंधारा गाळमुक्त् करण्यात येत आहे. यावेळी प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भुपेशभाई पटेल, नरेंद्रसिंग सिसोदिया, ज्ञानेश्वर पाटील, आर.के.शिंदे, एकनाथ जमादार, के.डी.पाटील, सर्जेराव पाटील, गोपाल भंडारी, यशवंत बाविस्कर, भरत मराठे, धनराज मराठे, अविनाश पाटील, नारायणसिंग चौधरी, अशोक पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, भुलेश्वर पाटील, प्रकाश चौधरी, योगेंद्र पाटील, रघुनाथ पाटील, सुधाकर पाटील, प्रदीप पाटील, भैया पाटील, भाऊसाहेब पाटील, जितू पाटील, लक्ष्मण पाटील, रमेश तलवारे, अरुण शिंदे, सुरेश पाटील, रमेश शिरसाठ, ओंकारसिंग परदेशी, टी.आर.दोरीक, हितेश भटूरकर, स्वीयसहाय्य्क अशोक कलाल, स्वीयसहाय्य्क सुनिल जैन आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*