धुळे जिल्ह्यात अन्नदात्यांचा आक्रोश : जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद

0
धुळे |  प्रतिनिधी :  शेतकर्‍यांनी कालपासून संपाचे हत्यार उपसले आहे. आज दुसर्‍या दिवशीही शेतकर्‍यांनी संप पुकारला. यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट दिसून आला.

आज दुसर्‍या दिवशीही शेतकर्‍यांनी बाजार समितीचा कारभार चालु दिला नाही. यामुळे लाखोंचा महसुल बुडाला आहे.

बळीराजाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पक्षासह शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करणार्‍या संघटनांनी  जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद व निदर्शने करुन प्रचंड घोषणाबाजी केली.

काही संतप्त शेतकर्‍यांनी आपल्या शेतातून आणलेला २ क्विंटल कांदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ङ्गेकून निषेध व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे माजी आ. प्रा.शरद पाटील यांनी केले.

गेल्या १ जूनपासून राज्यभरातील शेतकरी संपावर उतरले असून शेतकरी संपुर्ण कर्जमाङ्गीसाठी आक्रोश करीत आहेत. शेतकर्‍यांनी शेतात पिकवलेला भाजीपाला, कांदे, बटाटे, दूध रस्त्यांवर ङ्गेकून निषेध व्यक्त करीत आहेत.

या आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ व जानकारांनी आज धुळ्यात पाठिंबा दिला व ठिकठिकाणी आंदोलन करुन निषेध नोंदविला. आज सकाळी११वाजता शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील अनेक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात जमले या ठिकाणी घंटानाद करत जोरदार घोषणाबाजी केली.

काही शेतकर्‍यांनी आपल्या शेतातून आणलेला कांदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतून निषेध व्यक्त केला. यानंतर सर्व पदाधिकार्‍यांनी निवासी उपजिल्हाधिकारीतुकाराम हुलवळे यांना निवेदन दिले.

या आंदोलनात शिवसेनेचे प्रा.शरद पाटील, शिवआरोग्य सेनेच्या राज्य निमंत्रक डॉ.माधुरी बाङ्गना, शहर महिला आघाडीच्या हेमाताई हेमाडे, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राजेंद्र पाटील, भूपेंद्र लहामगे, जि.प.चे माजी अध्यक्ष सुधीर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी देशमुख, बाळू आनंदा सोनवणे, जगदिश पाटील, शिवसेना ग्राहक मंचाचे जिल्हाप्रमुख धीरज पाटील, आदिवासी विद्यार्थी संघटनेचे ऍड.राजन वाघ, विश्‍वनाथ सोनवणे, आर्वीचे सरपंच किशोर देवरे, अनकवाडीचे सरपंच संग्राम चव्हाण, कुंडाण्याचे माजी सरपंच गोरख पाटील,वलवाडीचे सरपंच मुकेश खरात, अवधानचे सरपंच सुरेश भदाणे, बाळापूरचे सरपंच भूषण पाटील, वरखेड्याचे माजी सरपंच विलास धनगर, सावळीचे सरपंच बाबाजी पाटील यांच्यासह अरुण धुमाळ, संदिप सुर्यवंशी, अशोक गवळी, कमलेश भामरे, दिनेश देवरे, मनोज पवार, प्रविण पाटील, शरद गोसावी, संजय अहिरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्राचार्य व्हि.के.भदाणे, गुलाबराव पाटील, साहेबराव देसाई, ऍड.एम.एस.पाटील यांच्यासह अंबोडे, पुरमेपाडा, जुन्नेर, आनंदखेडे, कापडणे,फागणे, गरताड, बिलाडी येथून मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*