केवायसी नसलेली खाती बंद करणार ; जिल्हा बँकेचा निर्णय

0
धुळे । दि.2 । प्रतिनिधी-जिल्ह बँकेचे खातेदार व ठेवीदार यांनी आपल्या बँक खात्याची केवायसी प्रक्रीया 11 ऑगष्टपर्यंत पुर्ण करून घ्यावी, अन्यथा त्यानंतर केवायसी नसलेली खाती बंद करण्यात येतील, असे आवाहन बँकेचे चेअरमन तथा माजी आ. राजवर्धन कदमबांडे यांनी केले आहे.
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खातेदारांनी आपल्या बचत, करंट व इतर खात्यासंदर्भात आपले खाते असलेल्या शाखेत खाते जाऊन खात्याची के.वाय.सी. दि.11 ऑगस्ट 2017 च्या आत पूर्ण करून घ्यावी.

खात्याची केवायसी करण्याची वैयक्तीक जबाबदारी खातेदाराची आहे. जे खातेदार (ठेवीदार) आपल्या खात्याची के.वाय.सी. पूर्ण करणार नाहीत, अशा खातेदारांची (सभासदांची) खाती अवैध ठरवून अशी खाती बंद करण्याचा निर्णय बँकेने घेतलेला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांनी दिली आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, के.वाय.सी.पूर्ण करण्याच्या हेतुने नमूद दस्तऐवजापैकी दोन दस्तऐवज बँकेत छायांकित प्रतीत सादर करावीत. पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, मतदान कार्ड, राज्याशासन अथवा केंद्रशासनाचे ओळखप्रत्र यापैकी एक दस्ताऐवज सादर करावा. तसेच बँकेतर्फे राज्य व केंद्र शासनाकडून जमा देण्यात येणार्‍या विविध अनुदानाच्या रक्कमा उदा.गॅस अनुदान, 50 पैशाच्या आतील आणेवारीच्या गावातील अनुदान, गारपीट अनुदान, लाल्यारोग अनुदान, पीक विमा भरपाई रक्कम तसेच विविध शासकीय अनुदानाच्या रक्कमा परस्पर लाभधारकाच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

त्यासाठी ग्राहकांनी आपल्याकडील आधार कार्डची झेरॉक्स प्रत बँकेत जमा करावी. या सर्व सुविधांसाठी बूंकेतर्फे ग्राहकांना नवीन पासबुक देण्यात येणार आहे.

तसेच एस.एम.एस. अलर्ट सुविधा आरटीजीएस, निफ्ट सुविधा लागू करण्यात आली आहे. त्यासाठी ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद शाखेत जावून बचत खात्यावर करुन घ्यावी.

त्यामुळे एस.एम.एस.अलर्टची सुविधा आपल्या आर्थिक व्यवहाराची नोंद तात्काळ आपल्या क्रमांकावर मिळू शकेल. ग्राहकांनी पुर्तता करण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे व मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी यांनी केले आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*