जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी

0
धुळे । दि.27 । प्रतिनिधी-शहरासह जिल्ह्यात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. इदच्या पार्श्वभूमीवर शहरात व जिल्ह्यात विविध ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
ईदनिमित्त शहरातील पांझरा नदी किनारी असलेला इदगाह तसेच इतर इदगाह मैदानांवर विशेष नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानंतर विविध मान्यवरांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, एसआरपीएफचे समादेशक चंद्रकांत गवळी, तहसीलदार ज्योती देवरे, डीवायएसपी हिम्मत जाधव, पोलीस निरिक्षक अनिल वडनेरे आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दोंडाईचा- येथेही ईद उत्साहात साजरी करण्यात आली. नगरपालिकेच्या वतीने दोंडाईचा शहरातील सर्व मुस्लिम बांधवाना रमजान ईदनिमित्त पालिकेच्या सत्ताधारी गटाचे प्रमुख तथा रावल उद्योग समूहाचे चेअरमन सरकारसाहेब रावल यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, बांधकाम सभापती संजय मराठे, नगरसेवक रवींद्र उपाध्ये, प्रवीण महाजन, भाजपाचे शहराध्यक्ष संजय तावडे, ईश्वर धनगर, विजय मराठे, जितेंद्र गिरासे, मक्कन माणिक,भरतरी ठाकूर, रमेश पारख, कृष्णा नगराळे, पंकज बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांच्या नमाज पठणासाठी नगराध्यक्षा सौ नयनकुंवरताई रावल यांच्या सुचनेनुसार ईदगाह परिसर स्वच्छ करण्यात आला. याठिकाणी असलेले सर्व काटेरी झुडुपे काढण्यात येऊन परिसर स्वच्छ करण्यात आला. याठिकाणी इतर सुविधादेखील पुरविण्यात आल्या होत्या.

पिंपळनेर- पिंपळनेरला ईद उत्साहात साजरी करण्यात आली. अप्पर तहसीलदार पिंपळनेर पोलीस ठाणे व शांतता कमेटीतर्फे मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

पिंपळनेर – सटाणा रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सकाळी मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. त्यानंतर महाराष्ट्र पेट्रोल पंपाजवळ अप्पर तहसीलदार वाय.सी.सूर्यवंशी, एपीआय सुनिल भाबड, पंचायत समिती सभापती संजय ठाकरे, उपसरपंच योगेश नेरकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिरसाठ, महेश पाटील, जे.टी.नगरकर, पांडूरंग सूर्यवंशी, पीएसआय योगेश खटकळे, पवार, देवेंद्र कोठावदे, योगेश भदाने, मुस्लीम समाज अध्यक्ष अलताप सैय्यद, गजेंद्र कोतकर, ललीत पाटील, भूषण वाघ, हाजी जावेद, जहुर जहाँगिदार, अलताफ शेख, हाजीताज महमंद, अफसर सैय्यद, ताजिद पठाण, लियाकत सैय्यद, नौबाद सैय्यद, हुसेनभाई मदारी, शेख शकुर, मुस्ताक शेख इलियास तांबोळी, सद्दाम कुरेशी, सादीक शहा, मोहसिन शेख, हाजी युसूफ शेठ, अय्युब पठाण, हाजी अहमद खाँ. पठाण, हाजी ईसाक शेख, अब्रार शेख, असलम सैय्यद, निसार शेख, तौसिफ पठाण, अमिन शहा, युनूस तांबोळी, इम्रान खाटीक, अन्वर नालबंद, बाबा शेख, मोहसिन शेख, हाजी अमजत अली, हाजी महेबुब अली यांचेसह शेकडो मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या सुभेच्छा दिल्या. शांततेत व जातीय सलोखा राखत नंतर शिरखुरमा देऊन मुस्लीम बांधवांनीही हिंदू-बांधवांशी मिलन कार्यक्रम केला.

 

LEAVE A REPLY

*