नवेनगरला शेतकर्‍याची आत्महत्त्या

0
पिंपळनेर । दि.2 । वार्ताहर-साक्री तालुक्यातील नवेनगर येथील 42 वर्षीय शेतकर्‍याने स्वत:च्या शेतात झाडाला दोर बांधून गळफास घेवून आत्महत्या केली.पिंपळनेर पोलिसात प्रथमदर्शी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
वसंत सुक्राम जगताप याने दि. 1 ऑगस्ट रोजी रात्री स्वत:च्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली.

या घटनेची माहिती मयताचे बंधू सखाराम सुक्राम जगताप याने पिंपळनेर पोलिसात दिली. त्यानुसार पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.

वैद्यकीय अधिक्षक नसल्याने नातेवाईकांचा संताप
यावेळी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक नसल्याने मयताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. यावेळी नवेनगरचे सरपंच मन्साराम भोये, काळू भोये, जि.प.सदस्य योगेश चौधरी यांनीही वरीष्ठ पातळीवर फोन केले.

ग्रामीण भागातील सर्वात मोठे व सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय असूनदेखील कायमस्वरुपी डॉक्टर नसल्याने रुग्णांना अतिशय त्रासाला सामोरे जावे लागते.

पावसाळ्याचे दिवस असून सर्पदंश, विज पडणे, डीलेव्हरीचे अनेक पेशंट येतात मात्र डॉक्टर नसल्याने रुग्णांना ताटकळत बसावे लागते.

आयुष्य विभागाचे डॉक्टर सेवा देतात तर त्याच डॉक्टरांना कायमस्वरुपी नियुक्ती देवून समायोजन का करु नये? त्यामुळे ग्रामीण जनतेच्या प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध होवून रुग्णांची होणारी हेळसांड थांबू शकते.

मात्र या आरोग्य विभागाच्या गहन प्रश्नाकडे साक्री तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे चित्र दिसते. आ.डी.एस.आहिरे यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित करुन पिंपळनेर तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयाच्या गंभीर प्रश्नावर प्रश्न उपस्थित करुन, पिंपळनेर ग्रामीण रुग्ण कायम स्वरुपी वैद्यकीय अधिक्षक व गायनाक स्पेशालिस्ट नेमणे गरजेचे आहे.

 

LEAVE A REPLY

*