अभियंत्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा

0
शिंदखेडा । प्रतिनिधी-येथील पंचायत समितीचे बांधकाम अभियंता संजय आनंदराव बागुल यांच्या विरोधात शिंदखेडा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदखेडा पोलीसात याबाबत दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेची सासू भटाबाई भिल यांना 2013-14 च्या काळात बेघर योजनेतू घरकूल मंजुर झाले होते.
यावेळी शाखा अभियंता संजय बागुल यांनी तुझे घर बांधुन देण्याचा ठेका मी घेतला आहे. घर बांधुन देईन, असे सांगुन व्हाऊचरवर अंगठे घेतले.
तसेच पैसे काढून घेतले. घराचे बांधकामदेखील केले नाही. त्यासंदर्भात भटाबाई भिल यांनी शाखा अभियंता संजय बागुल यांच्याविरुध्द शिंदखेडा न्यायालयात तक्रार दाखल केली.

त्याबाबत विचारण्यासाठी बागुल व इतर दोघे कदाने येथे गेले. फिर्यादी महिलेच्या सासर्‍यांशी त्यांची शाब्दीक चकमक उडाली.

त्याचे पर्यावसन शिविगाळमध्ये झाले. त्यानंतर फिर्यादी महिलेच्या डोक्याला संजय बागुल यांनी काठीने दुखापत केली व विनयभंग केला, असा आरोप बागुल यांच्यावर करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस स्टेशनला भादंवि 354, 354 (अ), 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय चव्हाण करीत आहेत.

यासंदर्भात शाखा अभियंता संजय बागुल यांच्याशी संपर्क साधला असता ते या घटनेबाबत अनभिज्ञ असल्याचे जाणवले. त्यामुळे या घटनेतील सत्य शोधुन काढण्याचे आव्हान शिंदखेडा पोलिसांसमोर आहे.

 

LEAVE A REPLY

*