दोंडाईचा शहरातील रस्ते होताहेत चकाचक !

0
दोंडाईचा । दि.20 । प्रतिनिधी-येथील नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यावधी च्या निधीतून रस्त्यांची कामे पालिकेच्या मार्फत सुरू करण्यात आली असून केशरानंद पेट्रोलपंप ते जे जे हॉस्पिटल , शिवाजी पुतळा ते शामसुंदर प्रोविजन, गणपती मंदिर आझाद चौक ही अत्यंत महत्वाच्या रस्त्याची कामे पूर्ण केल्यानंतर वरवाडे भागातील गौसिया नगर मधील रस्त्याच्या कामासाठी दलित वस्ती योजनेतून 67 लाखाच्या रस्त्याचा कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ नयनकुंवरताई रावल यांच्या हस्ते करण्यात आला .

यावेळी प्रभागाचे नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष नबुभाई पिंजारी, कृष्णा नगराळे, बांधकाम सभापती संजय मराठे, माजी विरोधी पक्षनेता प्रविण महाजन, भाजपा शहराध्यक्ष संजय तावडे, नगरसेवक रविंद्र उपाध्ये, भरतरी ठाकूर, निखिल राजपूत, ईश्वर धनगर, ईस्माईल पिंजारी, महेमुद जुम्मा, रजा हबीबी, आसीफ युसूफ, अहमद हाजी गफ्फार, शब्बीर मासुम, अयनोद्दीन हाजी करीम, गफ्फार हाजी बशीर, अशपाक सर, नसीर टेलर, अय्युब खाटीक, जाकीर उमर, आसीफ इंजिनिअर, फैजान आसीफ, अरबाज महेमुद, फिरोज आमद, गफ्फार खाटीक, पप्पू मंडपवाले व अनेक मान्यवर उपस्थित होते दरम्यान, पालिकेने शहरातील सर्व प्रमुख रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे शहरातील रस्ते चकाचक होत आहेत

 

LEAVE A REPLY

*