कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासीक – ना.रावल

0
दोंडाईचा । दि.24 । प्रतिनिधी-राज्याचे मुख्यंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना दिलेली कर्जमाफी ऐतिहासिक असून 40 लाख शेतकर्‍यांना त्याच लाभ होणार आहे.
विशेष म्हणजे नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यावर देखील अन्याय होऊ नये म्हणून आशा शेतकर्‍यांनादेखील मदत देऊन खर्‍या अर्थाने सर्वच शेतकर्‍यांना लाभ देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.
ज्या शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे त्यांचे मध्य मुदतीचे कर्ज देखील माफ होणार असून या निर्णयामुळे 40 लाख शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होणार आहे.

जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत. त्यांना 25 हजार रुपयांच्या काल मर्यादेपर्यंत 25 टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन सर्वसावेशक निर्णय आहे.

जे शेतकरी 30 जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांच्या बँक खात्यावर तत्काळ प्रोत्साहनपर अनुदान जा करण्यात येनार असून शेतकर्‍यांना कर्जमफीसाठी निधी उभा करण्याकरिता सर्व मंत्री आणि आमदार एक महिन्याचे वेतन जमा करणार.

शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून शेतकरी यासाठी शेतीमधील गुंतवणूक वाढविणार येणार आहे, याबरोबरच जलयुक्त शिवार सारख्या योजनांमधून मोठ्या प्राणावर कायापालटदेखील होत आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे मनापासून स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

*