भाजपातर्फे जिल्हा बँकेच्या विरोधात जिल्हाभर आंदोलन

0

धुळे । दि.3 । प्रतिनिधी-सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने शेतकर्‍यांना 10 हजार रुपये उचल देण्यासाठी अर्थहाय्य जिल्हा बँकेला केलेले असतांना धुळे-नंदुरबार जिल्हा बँक शेतकर्‍यांना 10 हजार रुपये उचल देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने भाजपातर्फे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह जिल्ह्यातील विविध शाखांसमोर आंदोलन करण्यात आले.

शासनाने थकबाकीदार शेतकर्‍यांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजने अंतर्गत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी 34 हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी दिलेली आहे. या कर्जमाफीचा 44 लाख थकबाकीदार शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

नवीन कर्ज देतांना शेतकर्‍यांना 10 हजार रुपये कर्जापोटी तात्काळ उचल देण्याचे आदेश शासनाने पारीत केलेले आहेत. बँकेच्या पैशांची हमी राज्य सरकारने घेतलेली आहे. सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने शेतकर्‍यांना 10 हजार रुपये उचल देण्यासाठी अर्थहाय्य जिल्हा बँकेला केलेले असतांना धुळे जिल्हा बँक शेतकर्‍यांना 10 हजार रुपये उचल देण्यासाठी टाळाटाळ करून सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना 10 हजार रुपये त्वरित उचल देण्याचे स्पष्ट आदेश पारीत केलेले असतांना शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा बँकेवर काँग्रेस राष्ट्रवादी – काँग्रेसची सत्ता असल्याने सूड भावनेतून राज्यातील सत्तारुढ भाजपा शासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा बँकेने जिल्हाभरातील विविध राजकीय व्यक्तीच्या संस्था, सहकारी व खासगी प्रकल्प तसेच वैयक्तीक प्रतिष्ठाने यांना भरमसाठ कर्ज दिलेली आहेत.त्यांची परतफेड न झाल्याने शेतकर्‍यांची असलेली बँक अडचणीत आलेली आहे. बड्या नेतेमंडळींच्या कर्जवसुलीकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्य शेतकर्‍यांची किरकोळ रकमेची उचल देण्यासाठी अडवणूक केली जात आहे.

हे धोरण सरळ शेतकरी विरोधातील असून शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तातडीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 10 हजार रुपये उचल देण्यात यावी अन्यथा बँकेविरुध्द जिल्हा भारतीय जनता पार्टी आंदोलन छेडेल, असा इशारा भाजपाचे निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष भाजपा बबराव चौधरी, किशोर सिंघवी, वसंतराव बच्छाव, कामराज निकम, अरुण धोबी, प्रा.अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, प्रदीप कोठावदे, चंद्रजित पाटील, किशोर माळी, जिजबराव सोनवणे, धिरेंद्र सिसोदिया, सौ.सरलाबाई बोरसे, मिलींद पाटील, देवेंद्र पाटील, मनोहर भदाणे, बापू खलाणे, नारायणसिंह जमादार, डॉ.जितेंद्र ठाकूर, मंजुळा गावीत, दरबारसिंग गिरासे, सौ.वैशाली महाजन, सौ.लिलाबाई सूर्यवंशी, सौ.सविता पगारे, सौ.शितल ठाकूर, चंद्रकांत पाटील, संजय आसापुरे, सौ.आशाबाई पाटील, सौ.सुशिलाबाई जमादार, आबा धाकड, रत्नाकर बैसाणे, मोतीलाल पोतदार, संजय अहिरराव, अ‍ॅड.राहुल पाटील, नथ्थू पाटील, राहुल रंधे, हेमंत पाटील, संजय तायडे, संभाजीराव पगारे, सुरेश पाटील, तुळशीराम गावीत, मोहन सूर्यवंशी, संजय शर्मा, नारायण पाटील, प्रविण महाजन आदी यावेळी उपस्थित होते.

दोंडाईचा शाखेसमोर आंदोलन
दोंडाईचा- धुळे व नंदूरबार जिल्हा बँकेवर कॉग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असल्यामुळे राज्य सरकारच्या कर्जमाफीचे श्रेय मिळेल म्हणून जिल्हा बँकेने शेतकर्‍यांना 10 हजार रूपये देण्यापासून वंचित ठेवले आहे, त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या या आडमुठ्या धोरणाचा निषेध करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दोंडाईचा येथील शाखेत जावून बँकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 3 दिवसात शेतकर्‍यांना बँकेने 10 -10 हजार रूपये दिले नाहीत तर टाळे ठोकण्याचा इशारा भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, तालुकाध्यक्ष नथ्थु पाटील, जि.प.चे गटनेते कामराज निकम, दोंडाईचा शहराध्यक्ष संजय तावडे, बांधकाम सभापती संजय मराठे, नगरसेवक निखील राजपूत, नरेंद्र गिरासे, किशनचंद दोधेजा, जितेंद्र गिरासे, कृष्णा नगराळे, ईश्वर धनगर, पंकज चौधरी, महेंद्र कोळी, भरतरी ठाकूर, नितीन सदाराव, अनिल सिसोदिया, भरत जयपाल, रवि उपाध्ये, प्रविण महाजन, ईस्माईल पिंजारी, सुफीयान तडवी, अमीन पिंजारी, योगेश ठाकूर, संजय चंदने, नरेंद्र गिरासे, जोहरा शाह, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिंदखेडा तहसीलसमोर आंदोलन

शिंदखेडा- जिल्हा बँक शेतकर्‍यांना 10 हजाराची उचल देण्यास टाळाटाळ करत असून शेतकर्‍यांना 10 हजाराची उचल दोन दिवसात द्यावी अन्यथा जिल्हा बँकेला टाळे ठोकू, असा इशारा भाजपातर्फे देण्यात आला. शिंदखेडा येथे तहसील कार्यालयासमोर भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक जिल्यातील भाजपाचे लोकप्रतिनिधी बदनाम होण्यासाठी शेतकर्‍यांना पैसे देत नसल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. त्यानंतर मागणीचे निवेदन तहसीलदार, सहायक निबंधक व जिल्हा बँकचे शाखाधिकारी यांना देण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, जि.प.सदस्य कामराज निकम, तालुकाध्यक्ष नथु पाटील, नरेंद्र गिरासे सुभाष माळी, प्रकाश देसले, दिनेश सुर्यवंशी, दीपक चौधरी, दरबारसिंग गिरासे, खंडू भिल, डॉ दीपक बोरसे, डी. एस. गिरासे,जिजाबराव सोनवणे, डॉ नितीन चौधरी, संजीवनी सिसोदे, वाल्मिक पाटील, दयानंद पाटील आदी उपस्थित होते
येत्या दोन दिवसात 10 हजाराची उचल न दिल्यास धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार वारुडे, सहाय्यक निबंधक पी.आर.बागुल यांनी संबंधित बँकेला तशा सूचना देऊ असे सांगितले. त्यानंतर जिल्हा बँकेवर भाजप पदाधिकारी गेले असता त्यांना तेथील शाखाधिकारी एन. टी. वाघ व विभागीय अधिकारी बी. एच. बागल यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने भाजपा पदाधिकारी व बँक अधिकारी यांच्यात गोधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर बागुल यांनी प्रतिज्ञापत्राचे 2,704 फॉर्म सेक्रेटरीकडे दिले असून त्यांनी अद्याप जमा केले नसल्याचे सांगितले. ते लवकर जमा करून वरिष्ठ पातळीवर पाठवू. त्या नंतर शेतकर्‍यांना पैसे देऊ असे सांगितले.

चिमठाणे येथे निवेदन
चिमठाणे- भारतीय जनता पार्टीतर्फे यांनी चिमठाणे मध्यवर्ती बँकेला निवेदन देण्यात आले. दोन दिवसात शेतकर्‍यांना दहा हजाराची तात्काळ मदत न दिल्यास बँकेला ठोकू टाळे. छत्रपती शिवाजी महाराज योजने अंतर्गत शेतकर्‍यांना तातडीची मदत द्यावी अन्यथा बँकेला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन बँक व्यवस्थापकांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, धुळे जिल्हा मध्यवर्ती बँक जाणून बुजून शेतकर्‍यांना 10 हजाराची उचल देण्यात टाळाटाळ करत आहे. 10 हजरापासून वंचित न ठेवता दोन दिवसाच्या आत त्यांना उचल वाटप करण्यात यावी. अन्यथा आम्ही बँकेला कुलूप लावू अशा शब्दात इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, कामराज निकम, नथ्थू वारुळे, नरेंद्र गिरासे, जिजाबराव सोनवणे, दरबारसिंग गिरासे, नितीन चौधरी, खंडू भिल, दिपक बोरसे, प्रकाश देसले, सुभाष माळी, रणजित गिरासे, डॉ.विजय बोरसे, नारायण पाटील, दिलीप गिरासे, देवानंद बेडसे, महेंद्र गिरासे, रविंद्र गिरासे, वैभव माळी, मुकुंदा माही, उत्तम बोरसे, रविंद्र गिरासे, राजेंद्र गिरासे, दिपक चौधरी, दिनेश सूर्यवंशी, जगतसिंग गिरासे, चेतन परमार, पुंडलीक पवार, चेतन जैन, भाऊसाहेब माळी, संजिवनी सिसोदे आदिंच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.

 

LEAVE A REPLY

*