भुजल पातळी वाढण्यासाठी पाणी जिरविण्याची गरज – आ.अमरिशभाई

0
शिरपूर । दि. 20 । प्रतिनिधी-शिरपूर तालुक्यात पाण्याचे काम मोठया प्रमाणात यशस्वीरीत्या सुरु असून भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी पाण्याचा थेंब न थेंब जिरविण्याचे काम करीत आहोत.
पुढील पिढीसाठी पाण्याचे काम महत्वपूर्ण ठरणार आहे. चांगल्या कामात लोकसहभाग देखील वाढणे गरजेचे आहे. अनेर धरणाच्या उजव्या कालव्याच्या 14 नं. चारीमुळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत पाणी पोहचण्यास मोठी मदत झाली आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याचे काम चांगल्या रीतीने केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्क् केले असून असे सांगून व्यसनापासून दूर राहण्याचा महत्वपूर्ण सल्ला आ. अमरिशभाई पटेल यांनी दिला.
शिरपूर तालुक्यातील अनेर धरणापासून तब्ब्ल 25 कि.मी. अंतरावर आलेल्या 14 नं. चारीचे जलपूजन माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले.

यावेळी त्यांनी परिसरातील विविध पाटचारींची देखील पाहणी केली.थाळनेर येथे मंगळवार दि. 20 जून रोजी सकाळी 9.30 वाजता आ. अमरिशभाई पटेल यांनी जलपूजन करुन शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्याचे मोठे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले.

अनेर धरणाच्या उजव्या कालव्याच्या चारी (वितरिका) नं. 14 च्या लघुवितरिका नं. 6 चे जलपूजन करण्यात आले.

उपविभागीय अभियंता व्ही.एस.पाटील यांनी अनेर धरणासह चारी, पाटचारी यांबाबत सविस्त्र माहिती देवून आ.अमरिशभाई पटेल यांनी पाण्यासाठी केलेले कार्य अतुलनिय असल्याचे सांगितले.

तसेच अनेर प्रकल्पाच्या पाण्याचा योग्य् प्रकारे वापर करुन घ्यावा असेही सांगितले. आ.अमरिशभाईंनी केलेल्या कार्याला अजून बळ मिळण्यासाठी व पाण्यासाठी लोकचळवळ व्हावी असेही त्यांनी सांगितले.

माजी जि.प. उपाध्यक्ष के.डी.पाटील यांनीही अनेर धरणाच्या पाटचारीबाबत विवेचन करुन शिरपूर तालुक्यात सुरु असलेल्या शिरपूर पॅटर्न अंतर्गत जलसंधारणाच्या कामांमुळे तालुक्याची पाण्याची सुस्थिती स्प्ष्ट केली.

थाळनेरचे ज्ञानेश्वर पाटील यांनीही आपले मनोगत व्य्क्त् करुन आ.अमरिशभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव केला. माजी जि.प. सदस्य् नरेंद्रसिंह जमादार म्हणाले की, आ.अमरिशभाई पटेल हे गल्ली ते दिल्ली पर्यंतचे सक्षम नेते असल्याने देशभरात त्यांची किर्ती उल्लेखनीय आहे. जलसंधारणाच्या कामात मोठया प्रमाणात निधी उभारुन मशिनरी उपलब्ध करुन सुरु असलेले काम आश्चर्यकारक आहे.

यापूर्वी दि. 6 जून रोजी धरमखोयी नाल्यातील गाळ काढण्याच्या कामास प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला होता.

ते काम देखील प्रगतीपथावर आहे. तालुक्यातील विविध भागातील जलसिंचनाची अनेक कामे यशस्वीरीत्या पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्य्क्त् करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*