कुंडाणे येथे मारहाण : सात जखमी

0
धुळे । दि.21 । प्रतिनिधी-घर नावावर केल्याच्या वादातून 20 जणांवर सशस्त्र जमावाने हल्ला करुन घरातील साहित्याची तोडफोड केली.
या हल्ल्यात सात जण जखमी झाले आहेत. याबाबत माहिती अशी की, कुंडाणे (वेल्हाणे), ता.धुळे येथे राहणारे दादा शिवाजी पाटील यांच्या वडिलांच्या नावे असलेले घर दादाचा भाऊ राजेंद्र पाटील याच्या नावावर का केले, असा जाब ग्रामपंचायतीमध्ये विचारला.
त्याचा राग येवून रात्री आठ वाजेच्या सुमारास अनिल बारकू पाटीलसह 20 जणांनी काठ्या, लोखंडी सळई, कोयता घेवून दादा पाटील व अनिल रघुनाथ पाटील यांच्या घराव हल्ला केला. घरातील साहित्याची तोडफोड केली.

कोयदा, लोखंडी सळईने मारहाण केल्याने दादा पाटील, अनिल पाटील, रघुनाथ चैत्राम पाटील, प्रल्हाद रघुनाथ पाटील, धुडकू चैत्राम पाटील, मनिषा प्रल्हाद पाटील, योगिता अनिल पाटील हे गंभीर जखमी झाले. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात दादा शिवाजी पाटील यांनी फिर्याद दिली.

भादंवि 307, 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506, 452 प्रमाणे अनिल पाटील, मुरलीधर आनंदा पाटील, पंढरीनाथ साहेबराव पाटील, पुंडलीक गुलाब पाटील, गोकुळ आनंदा पाटील, विनोद रमेश पाटील, अबुसिंग विक्रम पाटील, समाधान गुलाब पाटील, भरत सोनू पाटील, प्रदीप साहेबराव पाटील, शरद पाटील, नारायण शिवदास पाटील, ज्ञानेश्वर नागराज पाटील, अशोक तुळशिराम पाटील, भगवान उत्तम पाटील, गोटू सोनू पाटील, दिलीप दुला पाटील, पंकज दिलीप मोरे, सुरेश दिलीप मोरे, समाधान शामराव पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

बालक ठार – लग्नाच्या वरातीत असलेल्या बँड पथकाच्या गाडीखाली चिरडून सहा वर्षाचा बालक ठार झाल्याची कळंबीर, ता.साक्री येथे घडली. अपघाताची नोंद साक्री पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, काल दि.20 जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कळंबीर येथे लग्नाच्या वरातीत नाचत असताना बँड पथकाच्या एमएच 18 एम 226 क्रमांकाच्या मिनीडोअरच्या मागील चाकात कार्तिक राकेश नरभवर, रा.कळंबीर हा आला.

त्यात तो गंभीर जखमी झाला व जागेवरच त्याचा मृत्यू झाला. याबाबत साक्री पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

वाळूसाठा जप्त – तावखेडा, ता.शिंदखेडा शिवारात साठवून ठेवलेला वाळूचा साठा मंडळ अधिकार्‍यांनी जप्त केला. या प्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तावखेडा शिवारातील गट नं.280/1/ब या ठिकाणी वाळूसाठा असल्याची माहिती मंडळ अधिकारी शिवराम नामदेव आढाळे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी तेथे छापा टाकला असता 800 गोण्यांनी भरलेली गाळलेली वाळू, चार वाळू गाळण्या, एक पाण्याचा टँकर असा 11 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी मंडळ अधिकारी शिवराम आढाळे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन बळवंत मुरलीधर बडगुजरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

जुगार अड्ड्यावर छापा – बिलाडी, ता.धुळे येथे झन्नामन्ना नावाचा जुगार खेळतांना चार जणांना रंगेहात पकडले. त्या ठिकाणाहून 12 हजार 545 रुपये रोख व चार मोबाईल आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, नगाव रोडवरील बिलाडी गावात एका झाडाखाली झन्नामन्ना नावाचा जुगार खेळतांना विरेंद्र धुडकू भोई, भटू पिराजी पवार, राहूल शिवाजी पाटील, नंदू ताराचंद पाटील यांना ताब्यात घेतले. ही कारवाई काल करण्यात आली.

 

 

LEAVE A REPLY

*