Saturday, April 27, 2024
Homeनगरबिनशेती आदेशापुर्वीच जमीन व्यवहाराच्या चौकशीची मागणी

बिनशेती आदेशापुर्वीच जमीन व्यवहाराच्या चौकशीची मागणी

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा शहरात स्वस्तात जमिनीचे गाजर दाखवत शेती क्षेत्र असलेल्या जमिनी बेकायदेशीर गुंठेवारी करून विक्री केली जात

- Advertisement -

असल्याने तुकडेबंदी आदेशाचा भंग होत असताना शेती झोनमधील जमिनी रहिवासी झोन म्हणून विक्री होत आहेत. यात जमीन बिनशेती, एनए करणे गरजेचे असताना बिगरशेती आदेश न करताच गुंठेवारी करून जमिनी विक्रीबाबत वृत्त प्रसिध्द झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

श्रीगोंदा पालिकेचा कर बुडत असताना बेकायदेशीर बांधकामे शेती क्षेत्रात उभी राहत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. शेतजमिनीची गुंठेवारी करून जमीन एनए न करता गुंठे करून विक्री केली जाते. यामुळे महसूल बुडत आहे. त्यातच पालिकेचा कर बुडाला आहे.

शेत जमिनीच्या वापर बदलून रहिवासी करण्यासाठी जमीन बिगरशेती करून या जमिनीचे गुंठेवारी करून विक्री केली तरच ही एक दोन गुंठे जमीन नावावर होत असते. जर शेत जमीन बिगरशेती करायची असेल तर विविध परवानगी घेऊन पालिका, नगररचना विभाग यांच्याकडून आराखडा मंजूर करून बिगरशेती जमीन करावी लागते.

मात्र शहरातील अनेक शेत जमिनीची सध्या गुंठेवारी सुरू असून पालिका, नगररचना, महसूल विभागाकडून परवानगी न घेताच गुंठेवारी करून शेत जमिनीची विक्री होत आहे. बिगरशेती करण्याचा खर्च नसल्याने अनेक गुंतवणूकदार या स्वस्तात मिळणार्‍या गुंठेवारीत पैसे गुंतवत आहेत. मात्र विकास आराखडा न करता शेत जमीन तुकडे पाडून विक्री केले असल्याने या शेत जमिनीचे मालक वाढत आहेत.

शेती क्षेत्रात असा जमिनीचे तुकडेबंदी आदेशाचा भंग होत आहे. याबाबत सार्वमतमध्ये बातमी प्रसिद्ध होताच शहरातील अनेक गुंतवणूकदार धास्तावले असून आपले नाव सातबारावर लागणार का या चिंतेत आहेत.

दुय्यम निबंधक कार्यालयात ठराविक काळात सर्वाधिक व्यवहार

खरेदी विक्री व्यवहार होत असताना आलेले सातबारा तपासणी करून तुकडेबंदी आदेशाचा भंग न होता खरेदी विक्री व्यवहार पूर्ण करून देण्याची जबाबदारी दुय्यम निबंधक यांची असते.मात्र लॉकडाऊन काळात मागील दीड महिन्यात झालेल्या खरेदी विक्री व्यवहारात अनियमितता असताना अनेक दस्त नोंदणी करण्यात आल्याची तक्रार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या