एनडीसीसीकडे ‘विका’ सोसायटींमार्फत पीककर्ज वाटपाची मागणी

0
नाशिक । जिल्हा बँकेने शेतकर्‍यांना विविध कार्यकारी विकास सोसायट्यांमार्फत पीककर्ज वितरण करावे, या मागणीचे निवेदन जिल्हा विविध कार्यकारी विकास सोसायटी संघटनेच्या वतीने जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी आधिकार्‍यांना देण्यात आले.

निवेदन देतेवेळी संघटनेचे संस्थापक राजू देसले, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत गायखे, निमंत्रक उत्तम खांडबहाले, राजाभाऊ ढगे, संपत वक्ते, किरण गायधनी आदी उपस्थित होते. जिल्हा बँकेचे सीईओ राजेंद्र बकाल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा बँकेने मार्च महिन्यात विविध कार्यकारी विकास सोसायटींना पत्र पाठवून कळवले होते की, मार्च महिन्या अखेर पर्यंत कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना एप्रिलमध्ये कर्जपुरवठा करावा, त्यासाठी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांचे पत्र सोसायट्यांना पाठवण्यात आलेले होते.

त्यामूळे त्यावेळी सुमारे 157 कोटी रुपये कर्ज शेतकर्‍यांनी बँकेला परतफेड केले. मात्र त्यानंतर जिल्हा बँकेने या शेतकर्‍यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर विविध कार्यकारी सोसायटी संघटनेने जिल्हा बँक अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांकडे 25 एप्रिलपर्यत पीककर्ज वाटप करण्याची मागणी केली होती.

LEAVE A REPLY

*