Thursday, April 25, 2024
Homeनाशिकरेशन दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी

रेशन दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी

येवला । प्रतिनिधी Yeola

शिधापत्रिकाधारकांना ( Ration Card Holders )धान्य दिल्यानंतर पावती न देणार्‍या रेशन दुकानदारावर ( Ration Shopkeeper )कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) केली आहे. मागणीचे निवेदन तहसीलदार प्रमोद हिले यांना दिले आहे.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत अंत्योदय व पिवळी शिधापत्रिका प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा गटातील शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात रेशन वाटप केले जात होते. परंतु करोना संकटकाळात अनेक लोक बेरोजगार झाले व कोणीही उपाशी राहू नये म्हणून केंद्र सरकारने रेशन कार्ड नसलेल्यांनाही मोफत धान्य वाटप केले.

अद्यापही शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात तसेच मोफत धान्य वाटप केले जाते; परंतु रेशन दुकानदार स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या सवडीनुसार व वेळेनुसार महिन्याच्या शेवटी दोनच दिवस धान्य वाटप करण्याची घाई करून थम्ब मशीन बंद असल्याचे सांगून धान्य वाटप केले जाते.

कदाचित मशीन चालू असले तरी दुकानदार पावती देत नाहीत म्हणून पावती न देणार्‍या दुकानदारावर योग्य ती चौकशी करून कारवाई करावी. तालुक्यातील गावागावांत जाऊन रेशन दुकानदारांच्या या मनमानीला आळा घालण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी वंचित बहुजन आघाडीचच्या वतीने देण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष संजय पगारे, उपाध्यक्ष मुक्तार भाई तांबोळी, युवा नेते माजी उपसरपंच शशिकांत जगताप, ज्येष्ठ नेते भाऊ लहरे, शहराध्यक्ष गफारभाई शेख, युवक जिल्हा उपाध्यक्ष दयानंद जाधव, वसंत घोडेरावं, युवक तालुकाध्यक्ष प्रवीण संसारे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या