आश्रमशाळेतील शिक्षकांना कायम करण्याची मागणी

0
राहुरी (प्रतिनिधी) – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणार्‍या आदिवासी निवासी आश्रम शाळांमध्ये तीन हजारापेक्षा अधिक वर्ग 3 व 4 चे तासिका व रोजंदारी तत्वावर कर्मचारी आहेत. या कर्मचार्‍यांना भरतीपूर्व विनाशर्त विनाअट कायमस्वरूपी सेवेत रूजू करावे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव निर्मळ यांनी केली.
मुंबई येथे विधानभवनात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या टीमने आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांची भेट घेतली.त्यांना निवेदनाद्वारे वरील मागणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष संजय गवारे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस निलेश तळेकर, संदीप कानवड़े, सोनल गंभीरे माळी आदी उपस्थित होते.
निर्मळ म्हणाले, सर्व कर्मचार्‍यांना कामगार कायद्याअंतर्गत एक वर्षापेक्षा अधिक सेवा दिली आहे. ज्या कर्मचार्‍याने एका वर्षापेक्षा अधिक सेवा दिली, अशा सर्व कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे ही शासनाची प्रथम जबाबदारी असून त्यानंतरच शासनाने पुढील प्रक्रिया करावी. यावेळी आदिवासी विकासमंत्री सावरा यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडून तो मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

*