15 ऑगस्टपूर्वी मुंबई विद्यापिठातील निकाल, गुणपत्रिका वितरीत करू : मुख्यमंत्री

0
मुंबई (प्रतिनिधी) | मुंबई विद्यापिठातील पेपर तपासणी विलंबावर आज विधानभवनावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निदर्शने केली तर मुंबई विद्यापीठावर शिवसेनेच्या युवासेनेने मोर्चा काढला या सार्‍या घडामोडींच्या प्रतिक्रिया विधानसभेच्या कामकाजात देखील उमटल्या.

मुंबई विद्यापीठातील सुमारे साडेसतरा लाख उत्तरपत्रिका ऑनलाइन पध्दतीने तपासण्याच्या नव्या पध्दतीमुळे निकाल लावण्यास उशीर झाल्याची कबुली विधानसभेत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिली, यापैकी 14 लाख उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या असून येत्या पाच तारखेपूर्वी निकाल जाहीर केले जातील अश हमी मुख्यमंत्र्यानी याबाबत बोलताना सदनात दिली.

औचित्याच्या मुद्याव्दारे विरोधी पक्षाने हा मुद्दा उपस्थित केला असता मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रश्नावर स्वत: राज्यपाल यानी लक्ष घातले असून त्यानी त्याबाबत आवश्यक सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

15 ऑगस्टपूर्वी विद्यार्थ्यांना त्याच्या गुणपत्रिका देण्याचे काम पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यानी दिली. भविष्यात या प्रकारच्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न सरकार करेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

*