दीपककुमार मीना जि.प.चे नवे सीईओ ; शंभरकर यांची समाजकल्याण आयुक्तपदी बदली

0

नाशिक :  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी दीपककुमार मीना यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

आज सायंकाळी 6 वाजता जि.प. प्रशासनाला नवे सीईओ नियुक्तीचे पत्र प्राप्त झाले. दीपककुमार मीना हे भारतीय प्रशासकीय सेवेतून निवड झालेले शासकीय अधिकारी असून जिल्हा परिषदेला थेट आयएएस श्रेणीचे सीईओ लाभले आहेत.

तर मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी शंभरकर यांचीही समाजकल्याण आयुक्त म्हणून पुणे येथे बदली झाली आहे. त्यांची बदली होणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत गत 15 दिवसांपासून सुरू होती.

आजही ते त्र्यंबक तालुक्यात दौर्‍यावर होते.

LEAVE A REPLY

*